Ahilyanagar BJP City President : संघनिष्ठेचं फळ, भाजप शहर जिल्हाध्यक्षपदाचा कारभार उद्योजकाच्या हाती

Anil Mohite Appointed Ahilyanagar BJP City President RSS Leader & Minister Radhakrishna Vikhe Supporter : भाजपने राज्यातील 22 शहर जिल्हाध्यक्षपदांची नावं जाहीर केली असून, अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्षपदाचा समावेश आहे.
Ahilyanagar BJP City President
Ahilyanagar BJP City PresidentSarkarnama
Published on
Updated on

BJP Ahilyanagar leadership : गेल्या सुमारे दीड महिन्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडल्यामुळे लांबणीवर पडलेल्या भाजपच्या शहर जिल्हाध्यक्षपदी अखेर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित उद्योजक अनिल मोहिते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपमधील मंत्री राधाकृष्ण विखे गटाकडूनच मोहिते यांचे नाव पुढे केल्याचे सांगितले जात असून यानिमित्ताने मंत्री विखे यांनी अहिल्यानगर शहरातील निष्ठावंतांवर एकप्रकारे मात केल्याचे मानले जाते.

भाजपकडून (BJP) या पदासाठी शिफारसी मागवल्या होत्या. इच्छुकांसाठी 14 पद्धधिकाऱ्यांनी पसंती क्रम मतदानही केले होते. त्यातून विद्यमान सरचिटणीस सचिन पारखी, माजी महापौर बाबासाहेब वाकळे व विद्यमान उपाध्यक्ष बाबासाहेब सानप या तिघांची नावे पक्षश्रेष्ठींकडे पाठवली गेली होती, तर मंत्री राधाकृष्ण विखे गटाकडून धनंजय जाधव यांचे नाव पुढे करण्यात आले होते. मात्र कमी वय असल्याने व पुढे संधी मिळण्याची शक्यता असल्याने हे नाव मागे पडले व त्याऐवजी उद्योजक अनिल मोहिते यांचे नाव पुढे आले.

याशिवाय शहर पक्ष संघटनेवर मंत्री विखे गटाचे निष्ठावंतांचे प्राबल्य निर्माण होणार, असा वाद निर्माण झाला होता. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी निष्ठावांतांच्या पाठीमागे पाठबळ निर्माण केले होते. मात्र विखे गटाकडून ऐनवेळी संघाशी निगडित अनिल मोहिते यांचे नाव पुढे केले गेल्याने निष्ठावांतांवर मात केल्याचे मानले जाते.

Ahilyanagar BJP City President
Amol Mitkari NCP : अमोल मिटकरींचं 'एक तीर तीन निशाण'; 'या' तीन नेत्यांना एकाच वेळी सुनावलं

अनिल मोहिते हे रवींद्र उर्फ राजाभाऊ मुळे यांच्या वर्चस्वाखालील विचार भारती या संघटनेचे पदाधिकारी आहेत. राजाभाऊ मुळे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित असले, तरी भाजपमधील निष्ठावांतांचा त्यांना विरोध आहे. त्यामुळे संघाशी निगडित मोहिते यांची जिल्हाध्यक्ष पदावर वर्णी लागली, तरी भाजपच्या निष्ठावंतांमध्ये नाराजीचा सूर आहे.

Ahilyanagar BJP City President
Kumbh Mela : कुंभमेळा या शब्दाचा अर्थ काय?

नवे शहर जिल्हाध्यक्ष मोहिते हे बुरुडगावमधील श्रीलक्ष्मी मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑप सोसायटी तसेच केडगावमधील लक्ष्मी अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी या आर्थिक संस्थांचे संस्थापक आहेत. तसेच त्यांचा ढवळपुरी (ता. पारनेर) येथे कृषीनाथ ग्रीन एनर्जी हा खासगी साखर कारखाना आहे व या कारखान्याचे ते उपाध्यक्ष आहेत.

याशिवाय सिंदखेड राजा (जि. बुलढाणा) तालुक्यातील दुसरबीड इथल्या जिजामाता सहकारी साखर कारखान्याचे ते कार्यकारी संचालक म्हणूनही कार्यरत आहेत. केडगाव उपनगरातील एस. एस. मोहिते विद्यालयाचे संस्थापक आणि वसुंधरा कृषी व ग्रामीण विकास संस्थेचे मुख्य प्रवर्तक आहेत. यशदा संस्थेचा जलनायक हा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. राज्यातील 22 जिल्हाध्यक्षांच्या निवडी भाजपचे प्रदेश निवडणूक अधिकारी आमदार चैनसुख संचेती यांनी जाहीर केल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com