
Ahilyanagar politics news : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तनपुरे वाड्यावर हजेरी लावत, तनपुरे परिवाराशी बंद दाराआड केलेल्या चर्चेनंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर दिसणार, अशा चर्चेने जोर धरला आहे.
अजितदादा तनपुरे यांच्या निवासस्थानी गेल्यावर तिथं सभापती अरुण तनपुरे पक्ष प्रवेशाचा फोटो भिंतीवर दिसला. उपमुख्यमंत्री अजितदादा, अरुण तनपुरे, हर्ष तनपुरे आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे होते. या फोटोकडे पाहून अजितदादांनी ‘‘तटकरेंच्या जागेवर प्राजक्तचा फोटो असता..!’’ असे उद्गार काढले. यावेळी मोठा हशा पिकला. अजितदादांनी यानिमित्ताने प्राजक्त तनपुरे यांना अप्रत्यक्ष प्रवेशाचे निमंत्रण दिल्याची चर्चा झडत आहे.
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) लवकरच अजितदांदाच्या पक्षात प्रवेश करणार, अशा बातम्या माध्यमांने झळकू लागल्यावर, तनपुरे यांनी समोर बाजू मांडली आहे. "उपमुख्यमंत्री माझ्या घरासमोरून जात आहेत, त्यांना चहाला सुद्धा बोलावू नये काय? आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं, पाहुणचार करणं, ही आपली मराठमोळी संस्कृती आहे", असे तनपुरे यांनी सांगितले.
राहुरीतील कार्यकर्ता मेळाव्यानंतर अजितदादांनी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या निवासस्थानी भेट दिली. तनपुरे कुटुंबियांबरोबर त्यांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला. यानंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे व त्यांच्या कुटुंबाशी अर्धा तास गोपनीय चर्चा केली.
यावर तनपुरे म्हणाले, 'उपमुख्यमंत्री पवार (Ajit Pawar) माझ्या काकांच्या घरी जेवायला आले. आमचे घर शेजारीच असल्याने कौटुंबिक दृष्टीने त्यांच्याकडे गेलो. उपमुख्यमंत्र्यांना आमच्या घरी चहा पाण्याला बोलविले'. बंद दाराआड काय चर्चा झाली, यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी कौटुंबिक चर्चेपलीकडे कोणतीही चर्चा झाली नाही, असेही तनपुरे यांनी ठामपणे सांगितले.
'मामा जयंत पाटील अजून, निर्णय घेत नाहीत, त्यामुळे तुम्ही निर्णय घेत नाहीत का? मामा भाजपमध्ये जात आहेत, अशी चर्चा आहे. या प्रश्नावर, 'हे मला तुमच्याकडूनच समजतं आहे, मला माहित नाही', असे सांगून मंत्री तनपुरे यांनी प्रश्नाला बगल दिली. अहिल्यानगर जिल्ह्याला मंत्रिपद देणार असल्याबद्दल उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी काही चर्चा झाली काय? या प्रश्नावर त्यांनी आईस्क्रीम नको म्हणाले, 'फक्त चहा घेतला. कौटुंबिक चर्चा झाली. इतर चर्चा झाली नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या निवासस्थानी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाचा फोटो भिंतीवर लावला होता. त्यात, उपमुख्यमंत्री अजित पवार, अरुण तनपुरे, युवा नेते हर्ष तनपुरे आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे होते. या फोटोकडे उपमुख्यमंत्री पवार यांचे लक्ष गेले.
यावेळी शेजारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे बसले होते. फोटोकडे पाहून उपमुख्यमंत्री पवार यांनी ‘‘तटकरेंच्या जागेवर प्राजक्तचा फोटो असता..!’’ असे उद्गार काढले. यावेळी मोठा हशा पिकला. यानिमित्ताने उपमुख्यमंत्री पवार यांनी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना अप्रत्यक्ष प्रवेशाचे निमंत्रण दिल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.