Ahilyadevi Holkar Memorial : चौंडीत निर्णय, मुंबईत शिक्कामोर्तब; अन् 681 कोटी 32 लाख रुपये मंजूर...

Mahayuti government Approves 681 Crore Plan for Ahilyadevi Holkar Memorial at Chondi Jamkhed Ahilyanagar : पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जामखेडच्या चौंडी इथल्या स्मृतीस्थळ विकास आराखड्यासाठी नियोजन विभागाकडून 681 कोटी खर्चास प्रशासकीय मान्यता.
Ahilyadevi Holkar Memorial
Ahilyadevi Holkar MemorialSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar Choundi development : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडी (ता. जामखेड) इथं झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळाचे जतन व संवर्धन विकासाचा आराखडा मंजूर करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली होती.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्ताने विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांच्या पुढाकारातून ही राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत स्मृतीस्थळाच्या जतनाचा आणि संवर्धनाचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला होता. आता यानुसार 681 कोटी 32 लाख रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने ही विकास आराखड्यात प्रशासकीय मान्यता दिली. यासंदर्भातील शासननिर्णय नियोजन विभागाने जारी केला आहे. सदर आराखड्याच्या संनियंत्रण आणि अंमलबजावणीची जबाबदारी अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात सातत्याने संबंधितांच्या बैठका घेऊन पाठपुरावा केला, त्यामुळे शासन निर्णय निश्चित वेळेत जारी होऊ शकला.

जगातील सर्वकालीन सर्वश्रेष्ठ स्त्री राज्यकर्त्या असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जन्मगावी चौंडी येथील त्यांच्या स्मृतीस्थळाचा विकास व्हावा, यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार प्रयत्नशील होते. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात नमूद केलेली आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय दर्जाची महत्वाची स्थळे, तीर्थक्षेत्रे परिसर विकास आराखडे यांची व्याप्ती आणि स्वरुप लक्षात घेऊन संबंधित आराखडे नियोजन विभागामार्फत राबविण्यात येतात.

Ahilyadevi Holkar Memorial
Kale Kolhe Parjane Kopargaon : काळे, कोल्हे अन् परजणेमध्ये रंगली जुगलबंदी; एकमेकांनी एकमेकांचा 'इतिहास' काढला

प्रशासकीय मंजुरीचा निर्णय

स्थानिक पातळीवरील संबंधित आणि तज्ञांशी चर्चा करुन चौंडी स्मृतीस्थळ जतन व विकास आणि त्यास लागणाऱ्या निधीचा आराखडा अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केला. त्यास मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या माध्यमातून 6 मे रोजी चौंडी येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यानंतर दोन आठवड्यातंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाने 681 कोटी 32 लाख रुपये खर्चाच्या विकास आराखड्यास प्रशासकीय मंजुरीचा शासननिर्णय आज जारी केला.

Ahilyadevi Holkar Memorial
Rupali Chakankar : आता चाकणकरांची मुख्यमंत्र्यांकडे धाव; म्हणाल्या, 'दोषरोपपत्र दाखल करण्यास पोलिसांकडून दिरंगाई....'

कामाबाबत महत्त्वाच्या सूचना

पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे यंदा त्रिशताब्दी जन्मवर्ष असून त्यानिमित्ताने त्यांच्या चौंडी जन्मगावी 6 मे 2025 रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत घेतलेल्या घेतलेल्या निर्णयानुसार नियोजन विभागाने निश्चित वेळेत आज निर्णय जारी केला. या निर्णयानुसार विकास आराखड्यातील कामे करताना त्यांचे ऐतिहासिक महत्व, वास्तूंची मूळ शैली जपण्याचे तसेच पुरातत्वीय जाण असलेल्या व्यक्ती, संस्थांकडूनंच ही कामे करु घ्यावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

कामाची कालमर्यादा निश्चित

जी कामे केंद्र सरकारच्या PRASAD योजना, स्वदेश दर्शन योजना किंवा अन्य योजनांमधून शक्य आहेत. ती त्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार आहेत. विकास आराखड्यातील सर्व कामे पुढील तीन वर्षात 31 मे 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देशही सरकारने निर्णयात दिले आहेत.

राष्ट्रपतींना विशेष आमंत्रण

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवासाठी भारताच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना 31 मे रोजी श्री क्षेत्र चौंडी इथं विशेष उपस्थित राहण्याचे निमंत्रण विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com