Maharashtra Cabinet Meeting : महायुती मंत्रिमंडळाच्या बैठकीवर 'होऊ दे खर्च'! दीडशे की, दीड कोटी? प्रशासनाचे खुलाशावर खुलासे!

Criticism in Maharashtra Over CM Devendra Fadnavis Cabinet Meeting Expenses in Chondi : अहिल्यानगर जिल्ह्याच्या जामखेड चौंडी इथं सीएम देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवरील खर्चावरून प्रशानसाचे खुलाशावर खुलासे सुरू आहेत.
Maharashtra Cabinet Meeting 1
Maharashtra Cabinet Meeting 1Sarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar Jamkhed Chondi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक चौंडी (ता. जामखेड) इथं होत आहेत. तीन तासांच्या या बैठकीसाठी अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. बैठकीसाठी शाही व्यवस्था व्हावी, यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे.

यासाठी सुरुवातीला 150 कोटीची निविदा जाहीर करण्यात आली. एवढ्या खर्चाचा आकड्यावरून टीका सुरू झाली. शून्याचा गोंधळ झाल्याचे सांगून प्रशासनाने 15 कोटी खर्च अपेक्षित असल्याचे सांगितलं. यानंतर दुसरी दुरुस्तीची निविदा प्रसिद्ध करत एक कोटी 28 लाखांचा मंडपासह इतर खर्च होणार असल्याचे सांगितले जात आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाच्या एक्स खात्यावर देखील खुलासा देखील करण्यात आला आहे. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या या बैठकीवर होत असलेल्या कोटीच्या खर्चांवरून विरोधकांनी निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे.

महायुती सरकारच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीपासून ते मंत्रिमंडळाच्या विस्तारापर्यंत, अलीकडेच भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांचा झालेला रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावरील खर्चांचे आकडे पहिल्यास ते कोटी रुपयांमध्येच आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या जन्मगावी चौंडी (ता. जामखेड) इथं मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या तीन तासांच्या बैठकीवरचा खर्च देखील कोटींच्या घरात आहे.

Maharashtra Cabinet Meeting 1
BJP vs Vikhe Patil supporters : 'भाजप मंडल अध्यक्ष व्हायचंय, DNA काँग्रेसचाच असला पाहिजे'; श्रीरामपूकरांच्या बॅनरबाजीवरून तणाव

अहिल्यादेवींच्या 300 जयंतीनिमित्त मध्य प्रदेश सरकारने त्यांचे सासर असलेल्या महेश्वर येथे मंत्रिमंडळाची बैठक घेतली. त्याचाच कित्ता गिरवत महायुतीच्या (Mahayuti) सरकारने चौंडीत बैठक घेण्याचा निर्णय घेतला. चौंडी इथं होत असलेल्या या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या नियोजनासाठी प्रशासनाकडून सुरूवातीला 150 कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली.

Maharashtra Cabinet Meeting 1
Mahayuti Government Meeting : महायुती सरकारची चौंडीत होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवर 15 कोटींचा खर्च

तीन तासांच्या या बैठकीवर एवढ्या कोटींचा खर्च होणार म्हटल्यावर, विरोधकांनी टीका सुरू केली. प्रशासनानं यावर दुरुस्तीची निविदा प्रसिद्ध करत, शून्याचा घोळ झाला असे सांगून 1 कोटी 28 लाख रुपयांचा मंडपासह इतर खर्च असल्याचा खुलासा केला. काहींना हा खर्च 15 कोटी रुपयांपर्यंत अपेक्षित असल्याचे सांगितले.

अहिल्यादेवींचं चौंडी हे गाव कर्जत-जामखेड मतदारसंघात येते. तिथं रोहित पवार आमदार, तर याच मतदारसंघातील प्रा. राम शिंदे विधान परिषदेवर सभापती आहेत. अरणगाव ते चौंडी आणि नगर ते करमाळ्याच्या रस्ता दुरुस्तीसाठी 20 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. मात्र प्रत्यक्षात या रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. इकडं मात्र, बैठकीच्या व्यवस्थेसाठी तातडीने कोटींच्या निविदा प्रसिद्ध होत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com