
Punyashlok Ahilyadevi Holkar Jamkhed : पुण्यश्लोक होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्तानं चौंडी (ता. जामखेड) इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित झाला.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शाह त्रिशताब्दी जयंतीला येतील, असं नियोजन होतं. राम शिंदेंनी स्वतः राष्ट्रपतींना आमंत्रण दिलं होतं. भारत-पाकिस्तान देशातील तणावाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाला या दिग्गजांना येता आलं नसल्याचं सांगितलं गेलं. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढच्या वर्षी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चौंडी इथं नक्की आणू, असा शब्द दिला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज चौंडी इथं येऊन अहिल्यादेवी यांना अभिवादन केले. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, दुग्ध विकास मंत्री अतुल सावे, क्रीडामंत्री दत्त मामा भरणे, ज्येष्ठ नेते अण्णा डांगे आदी अन्य उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, "वंचित दलित व आदिवासी कातकरी यांना शिक्षण व रोजगारासाठी प्रयत्न करणार्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी वंचितांसाठी राज्य चालवले. आम्हीही तोच आदर्श समोर ठेवून राज्य चालवण्याची प्रतिज्ञा आज घेत आहोत".
मुख्यमंत्री फडणवीस यांनी अहिल्यादेवींच्या राज्यकार्याची माहिती देऊन त्यांचा कारभार आमच्यासाठी आदर्शवत असल्याचे सांगितले. कल्याणकारी राज्याच्या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे हिंदवी स्वराज्य व त्यासोबतच छत्रपतींच्या आदर्शावर काम करणारे लोकमाता अहिल्यादेवींचे कल्याणकारी राज्य ही दोन राज्य आमचा आदर्श आहे, असे सांगून अहिल्यादेवी यांनी स्वतःची शस्त्रास्त्रे बनवली होती. महिला सैनिकांची तुकडीही त्यांची होती. तोच आदर्श भारत सरकारचा पण आहे, असे सांगितले.
'नरेंद्र मोदी सरकारने स्वतः बनवलेले ब्रह्मोस्त्र क्षेपणास्त्राने नुकत्याच झालेल्या 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानची लष्करी तळे उद्ध्वस्त केली हे आपण पाहिले, असे सांगताच हुंडा देणे व घेणे हा गुन्हा अहिल्यादेवींनी ठरवला होता व त्यांच्या 28 वर्षाच्या राज्य कारभारात असा गुन्हा करण्याची कोणाची हिंमत नव्हती', असे फडणवीस म्हणाले. नगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर केले आहे. चौंडी येथे 681 कोटींचा विकास आराखडा केला आहे. आदिशक्ती अभियानांतर्गत महिला सक्षमीकरण योजना राबवली जात आहे. सिनेमाच्या माध्यमातून अहिल्यादेवींच्या जीवनावर बहुभाषिक चित्रपट करणार आहोत, असेही फडणवीस यांनी म्हटले.
या कार्यक्रमाचे स्वागत गोपीचंद पडळकर यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी धनगर आरक्षणाचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्की सोडवतील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच राज्य सरकारच्या नव्या धर्मांतर बंदी कायद्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे, तसेच लव जिहाद विरोधातील कायद्याचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने हा कायदा करावा, अशी मागणी केली.
सभापती प्रा. शिंदे यांनी प्रस्तावित केले. चौंडीच्या विकासासाठी महायुती सरकारने 681 कोटी दिल्याने आज सारा समाज समाधानात आहे. त्यामुळे नवीन काही मागायचे नाही. शिवाय याच विकास आराखड्या अंतर्गत 500 कोटी राखीव निधी आहे. त्यातून चौंडीला येणारे सर्व रस्ते साडेतीनशे कोटीत केले जाणार आहेत, व स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर सीना नदीच्या बेटात होणार्या अहिल्यादेवींच्या पुतळ्यामुळे बुडीत होणार्या बंधार्यांच्या निर्मणासाठी दीडशे कोटी त्यात राखीव आहेत, असे सांगितले.
पालकमंत्री विखे पाटील यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या नावाने जिल्ह्यातील एक लाख एकल महिलांच्या पुनर्वसन व कौशल्य विकासाचा प्रकल्प तयार केला असून त्याला सरकारने मंजुरी द्यावी, तसेच अहिल्यानगर शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे छोटे स्मारक व्हावे, यासाठी सरकारने पाठबळ द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.