Sangram Jagtap AIMIM criticism : 'चिकणी चमेली'ला 'खुराड बोकड'नं प्रत्युत्तर; ओवैसी, जलीलांना सुनावताना, संग्राम जगतापांचा 'डेमोग्राफिक जिहाद'वर घणाघात

Sangram Jagtap Slams Owaisi and Jaleel at Ahilyanagar Protest : अहिल्यानगरमधील जनआक्रोश मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी डेमोग्राफिक जिहादवर घणाघात केला.
Sangram Jagtap AIMIM criticism
Sangram Jagtap AIMIM criticismSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar political protest : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी AIMIMचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांना जशाच तसं उत्तर दिलं आहे.

'खुराड बोकड' म्हणत, थेट असदुद्दीन ओवैसी आणि इम्तियाज जलील यांच्यावर आमदार जगताप यांनी निशाणा झाला. अहिल्यानगरमधील मुकुंदनगर भागात झालेल्या 'AIMIM'चे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी आमदार जगतापांवर 'चिकणी चमेली' म्हणत निशाणा साधला होता.

भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबनाचा प्रकार झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी एका मुस्लिम युवकाला अटक केली आहे. या विटंबनेच्या प्रकाराच्या निषेधासाठी आज अहिल्यानगरमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. आमदार जगताप यांच्यासह भाजप (BJP) आमदार गोपीचंद पडळकर देखील मोर्चात सहभागी झाले होते.

संग्राम जगताप यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेवर पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार (Ajit Pawar) प्रचंड नाराज आहे. त्यांनी पक्षातर्फे नोटीस बजावली आहे. तसंच हिंदुत्वाच्या भूमिकेच्या नावाखाली धार्मिक भावना दुखवल्याप्रकरणी अकोला इथं संग्राम जगताप यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. तसंच खासदार सुप्रिया सुळे यांनी नोटिशींपेक्षा हकालपट्टी करा, अशी मागणी अजित पवारांकडे केली आहे.

Sangram Jagtap AIMIM criticism
Sangram Jagtap Hindutva stand : सुप्रिया सुळेंकडून हकालपट्टीची, तर पडळकरांचे संग्राम जगतापांच्या हिंदुत्ववादी भूमिकेवर अन् नोटिशीवर सूचक भाष्य! (Video)

यामुळे आजच्या सभेत संग्राम जगताप यावर काय भाष्य करतात, काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले असतानाच, त्यांनी पुन्हा विशिष्ट समाज म्हणत 'डेमोग्राफिक जिहाद'वर घणाघात केला. 'AIMIM'चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यावर आमदार जगतापांनी जोरदार निशाणा साधला.

Sangram Jagtap AIMIM criticism
Thackeray brothers dinner : मातोश्रीवर पोहचताच भेटीमागचे राज ठाकरेंनी सांगितले 'खास' कारण

'डेमोग्राफिक जिहाद'वर घणाघात

संग्राम जगताप यांनी, 'पश्चिम बंगाल आणि मालेगावची उदाहरणे देत, 'डेमोग्राफिक जिहाद' कसा असतो, यावर भाष्य करताना, आज मालेगावमध्ये 'AIMIM'चा आमदार आहे. मालेगावमध्ये पूर्वी काँग्रेसची लोक निवडून येत होती. त्यांच्या सर्व समावेशक भूमिकेमुळे हळूहळू तिथं त्यांची लोकसंख्या वाढली, मतदार वाढले, आणि आता तिथं 'AIMIM'चा आमदार आहे, ही 'AIMIM'ची बोकडं अहिल्यानगरमध्ये येऊन गेली,' असा घणाघात केला.

'खुराड बोकड' म्हणत सुनावलं

आमदार जगताप म्हणाले, "एक हैदराबाद येथून मोठं 'खुराड बोकड' आलं, तर दुसरे छत्रपती संभाजीनगर इथून दुसरं बोकड आलं. मला या बोकडांचा आवाज काढता येत नाही. ही बोकड आली, पण काहीतरी बडबड करत राहिलं. आणि ती केली पण पाहिजे. नाही बोलले, तर आपल्याला लोक विचारणार नाही. पूर्वी ही भाषणामध्ये एक डायलॉग मारायचे, पंधरा मिनिटं पोलिस हटाव, आता ती भाषा बदलली आहे. आता आम्ही म्हणतो आम्हाला पाच मिनिटं पाहिजेत. पंधरा मिनिटं लागत पण नाहीत, पाचच मिनिटं सांगतो."

दोन समाजामध्ये तेढ लावली

'आम्ही भारतीय नागरिक आहोत. संविधान मानतो, आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत. तुम्ही आमचे परीक्षा पाहू नका, त्यांनी साधा फरीद खानचा सुद्धा निषेध केला नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारून आम्ही, हा जिल्हा संविधानावर चालवतो, असा संदेश संपूर्ण देशाला दिलेला आहे. याच महामानवाच्या पुतळ्याचा अवमान फरीद खान याने वैयक्तिक भांडणांतून केला. दोन समाजामध्ये तेढ लावण्याचा प्रकार केला. जिरवा जिरवीच्या प्रकारांमध्ये याच बोकडांचीच जिरली. पोलिसांनी दमदार कामगिरी केली आणि त्याला अटक केली,' असे आमदार जगताप यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com