
Ahilyanagar mayor election news : नेवासा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण व्यक्तीकरीता निघाल्याने 'कोण होणार तिसरा नगराध्यक्ष' याविषयी शहरात चर्चेला उधाण आले आहे.
मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh), बाळासाहेब मुरकुटे आणि विठ्ठल लंघे यांच्यात लढत झाली. यात महायुतीचे उमेदवार विठ्ठल लंघे आमदार झाले. शहरात त्यांनाच सर्वाधिक मतदान पडल्याने नगरपंचायत निवडणुकीत त्यांचीच बाजू सरस समजली जात आहे.
मुंबईतील नगरविकास राज्यमंत्र्यांच्या दालनात नगराध्यक्ष पदाकरिता झालेल्या आरक्षण सोडतीत नगराध्यक्षपद सर्वसाधारण करिता निघाले आहे. नेवासे नगरपंचायतीला तीन वर्षांपासून लोकनियुक्त कारभारी नसल्याने शहरात नवीन योजना कोसोदूर राहिल्या आहेत. नगरपंचायत करिता निवडणूक प्रक्रिया सुरू होऊन आज नगराध्यक्षाचे आरक्षण जाहीर झाल्याने मतदारात (Voter) समाधानाचे चित्र आहे.
नेवासे नगरपंचायत स्थापन होऊन अवघे पाच वर्ष पूर्ण झाले आणि येथील कारभार प्रशासकाच्या ताब्यात गेला. 16 जून 2022 रोजी तत्कालीन नगराध्यक्ष योगिता सतीश पिंपळे यांच्या अध्यक्षतेखाली व त्यावेळचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांच्या उपस्थितीत शेवटची सर्वसाधारण सभा झाली होती.
सतरा सदस्य असलेल्या नगरपंचायतीत सन 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत माजी आमदार गडाख गटाचे आठ सदस्य होते. माजी आमदार मुरकुटे गटाचे सात, काँग्रेसचा एक व अपक्ष एक, असे बलाबल होते. नगराध्यक्षपदा करिता एसटी आरक्षण असल्याने मुरकुटे गटाच्या नगरसेविकेस पहिली संधी मिळाली. अडीच वर्षानंतर गडाख गटाच्या योगिता पिंपळे नगराध्यक्षा झाल्या होत्या. 16 जून 2022 पासून इथं प्रशासकराज आहे. तीन वर्ष चार महिने प्रशासक असल्याने येथील कामकाजात दिरंगाई व दुर्लक्ष झाल्याने नाराजीचा सूर अधिक राहिला.
गडाख आणि मुरकुटे गटाचे वर्चस्व असताना तसेच मागील सदस्य मंडळात लंघे गटाचा एकही सदस्य नसताना शहरात लंघे यांनी आजी-माजी आमदारांवर वर्चस्व मिळविल्याने नगरपंचायत निवडणुकीत ते पुन्हा यशस्वी होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नगरपंचायत करिता 22 हजार 618 मतदार मतदानाचा हक्क बजावतील, असे मुख्याधिकारी निखिल फराटे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.