Ahilyanagar Parner APMC : प्रशांत गायकवाड यांना मोठा झटका! 'या' कारणाने गमावलं संचालकपद गेलं, प्रशासनाकडून निवडणुकीच्या हालचाली

Ahilyanagar Parner APMC Director NCP Prashant Gaikwad Post Cancelled by District Deputy Registrar : पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशांत गायकवाड यांच्यावर संचालक पद गमवण्याची वेळ आली आहे.
NCP Prashant Gaikwad
NCP Prashant GaikwadSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar political news : पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक प्रशांत गायकवाड गेली दीड वर्षात संचालक मंडळाच्या बैठकीस अनेकदा गैरहजर राहिले. याचा ठपका ठेवत जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवशे यांनी त्यांचे संचालक पद रद्द करण्याची कारवाई केली.

पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही दिवसापूर्वी लेखापरीक्षण झाले होते. सहकार विभागाचे लेखापरीक्षक डी. आर. पाटील यांनी केलेल्या लेखापरीक्षणात संचालक मंडळाच्या बहुतांश बैठकीला गायकवाड गैरहजर राहिल्याचा अहवाल जिल्हा उपनिबंधकांना पाठवला होता. त्या नुसार सुरवशे यांनी ही कारवाई केली आहे.

राष्ट्रवादीचे (NCP) प्रशांत गायकवाड यांना कारवाईचा लेखी आदेश उपनिबंधकांनी बजावला आहे. सहकार कायदा नियम 73 अन्वये बाजार समिती सहकार निवडणूक प्राधिकरणकडे रिक्त जागेसंदर्भात अहवाल पाठविण्यात येणार आहे. यानंतर या जागेसंदर्भात निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. गायकवाड हे तीनपेक्षा जास्त बैठकीला गैरहजर राहिले असल्याचा अहवाल आहे.

बाजार पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना, अशी सत्ता आहे. स्थापनेच्या वेळी महाविकास आघाडी होती. मात्र निवडणुकी नंतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. शरद पवार व अजित पवार (Ajit Pawar), असे दोन गट पडले. यानंतर दोन्ही गटात अंतर्गत वादाला तोंड फुटलं. पुढे या वादातून काही संचालकांच्या पाठिंब्यातून बाजार समितीची चौकशीही लावली होती. परंतु या चौकशीत काही निष्पन्न झाले नाही. याच वादाचा हा परिणाम म्हणून गायकवाड यांचे पद गेल्याची चर्चा आहे.

NCP Prashant Gaikwad
Radhakrishna Vikhe On Rohit Pawar : अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांची तिसरी प्रेस; मुंबईतून मोठा 'शंका बॉम्ब'! मंत्री विखे म्हणाले, “भानगडी बंद करा!”

दोनदा अविश्वास ठराव

प्रशांत गायकवाड यांनी कृषि उत्पन्न बाजार समितीचे 2016 ते 2022 या काळात सभापती पद भूषविले. त्या काळात त्यांची चांगली कामगिरी होती. मात्र त्या काळात सुद्धा गटबाजीतून त्यांच्यावर दोनवेळा अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. परंतु ते ठराव फेटाळून लावण्यात गायकवाड यांना यश आले होते.

NCP Prashant Gaikwad
Sunetra Pawar NCP President : ‘तो’ दिवस ठरला! सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर : प्रफुल पटेलांनी सांगितली नेमकी तारीख

प्रशांत गायकवाड म्हणाले...

लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर सुमारे दोन वर्षांपासून मी एकदाही संचालक मंडळाच्या बैठकीस गेलो नाही. त्यामुळे ही कारवाई सहकार कायद्यानुसार झालेले आहे. याबाबत तक्रार करण्याचा किंवा आपिलात जाण्याचा प्रश्नच नाही, अशी प्रतिक्रिया प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com