Forest department controversy : मंत्री विखे नाईकांच्या खात्यातील अधिकाऱ्यांवर संतापले; 'लोकांमध्ये आक्रोश, वन अधिकारी पिंजऱ्याच्या बाहेर...'

Radhakrishna Vikhe Ganesh Naik Angry Over Leopard Attacks : बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांवरून वनविभागाच्या कारभारावर अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील वनविभागातील अधिकाऱ्यांच्या कारभारावर नाराज.
Radhakrishna Vikhe
Radhakrishna VikheSarkarnama
Published on
Updated on

Leopard attack Maharashtra : भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गणेश नाईक यांच्याकडे असलेल्या वनविभागातील अधिकाऱ्यांच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे. अहिल्यानगर अन् पुणे परिसरात बिबट अन् मानव यांच्या संघर्ष सुरू झाला आहे.

'वनविभागातील अधिकारी मात्र सुस्तावलेत. वन विभागातील अधिकारी फक्त पिंजरा लावला आहे, यापलीकडे जायलाच मागत नाही. ते पिंजऱ्याच्या बाहेर जायलाच तयार नाही, ही दुर्दैवाची बाब आहे,' असा संताप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) म्हणाले, "जिल्हाधिकारी यांच्याबरोबर बैठक झालेली आहे. बिबट्यांच्या हल्ल्यात निरपराध लोकांचा बळी जात आहे. दुर्दैवाने अहिल्यानगरमध्ये वन विभाग सुस्तावले आहे. त्यात काहीच दिसत नाही. अधिकाऱ्यांशी बोलल्यावर ते फक्त, पिंजरा लावला आहे, एवढीच प्रतिक्रिया देतात. ते पिंजराच्या बाहेर जायलाच तयार नाही, ही दुर्दैवाची बाब आहे." यासाठीच जिल्हाधिकारी यांच्याशी बैठक घेऊन त्यांना सूचना दिलेल्या आहेत की, ज्या भागात बिबट प्रवण क्षेत्र आहे, तिथं नाईट व्हिजनचे सीसीटीव्हीचे इंस्टॉलेशन करा, असे विखे पाटील यांनी म्हटले.

'कर्मचाऱ्यांकडे (Worker) साधन नाहीत. त्यांचा दोष नाही. त्यांचे वरिष्ठ अधिकारी सुस्तावलेले आहेत. कर्मचाऱ्यांना रात्री जंगलात जायचं असतं. त्याला नाईट व्हिजन यंत्रणा मिळाली पाहिजे, रात्रीच्या काळामध्ये ड्रोन चालू शकतात का? तसं असेल तर, त्याद्वारे बिबट्याच्या वावराचा शोध घेता येऊ शकतो. अशी काही आधुनिक साधने लागतात, त्यासाठी जो काही निधी लागेल तो जिल्हा नियोजन मंडळातून देण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला आपण केले आहेत. तातडीने पावलं उचलल्यावर त्यामुळे जे भीतीच वातावरण निर्माण झालेला आहे, त्यावर आपल्याला उपाययोजना करता येतील,' असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

Radhakrishna Vikhe
Pune leopard area marriage issue : बिबट प्रवण क्षेत्रातला नवरा नको गं बाई! वनमंत्री गणेश नाईक म्हणतात...

1100 पेक्षा जास्त बिबटे

अहिल्यानगर जिल्ह्यात, बिबट्यांमुळे शेतकरी, सर्वसामान्यांमध्ये सर्व दहशतीचे वातावरण आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात तब्बल 1100 पेक्षा जास्त बिबटे आहेत. त्यांची उत्पत्ती वेगाने वाढत आहे. वाढत्या बिबट संख्येमुळे अनेकांवर हल्ल्याच्या घटना झाल्या. फक्त रेस्क्यू सेंटर उभारून चालणार नाही. बिबट्यांना रोखण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे उपाययोजना सुरू कराव्या लागणार आहे.

Radhakrishna Vikhe
Amravati Mahapalika : अमरावतीत नवनीत राणा विरुद्ध रवी राणा संघर्ष? युवा स्वाभिमानचा स्वबळाचा नारा; भाजपनेही ठोकला शड्डू

पिंजऱ्यांची संख्या वाढवणार

'रेस्क्यू सेंटरमध्ये तीनशे बिबटे ठेवण्याची व्यवस्था करणार आहोत. अहिल्यानगर जिल्ह्यात आतापर्यंत 25 बिबट्यांना पिंजऱ्यात अटकवण्यात यश आलं आहे. पिंजऱ्यांची संख्या वाढवावी लागणार आहे. यासाठी तातडीने पावलं उचलली जात आहे. कायद्याच्या अडचणीमुळे वनविभागाला मोठी बंधने आहेत. मंत्रिमंडळ बैठकीतही बिबट्यांच्या वाढत्या संख्येवर चर्चा झाली असून, शेड्युल एक मधून काढण्याचा प्रस्ताव आहे', अशी माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

'एआय'च्या माध्यमातून बिबट्यावर नजर

''एआय'च्या माध्यमातून बिबट्यावर नजर ठेवून अलार्म वाजेल, अशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न आहे. बिबट्याला दिलेलं संरक्षण शेड्युलमधून काढलं पाहिजे ही मागणी वाढत चालली आहे, आम्हीही त्यासाठी पाठपुरावा करू,' असेही मंत्री विखे पाटील यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com