
Beed BJP MLA news : बीडचे भाजप आमदार सुरेश धस यांनी तत्कालीन मंत्री तथा एनसीपीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या भेटीवर भाष्य केले आहे. भाजप आमदार धस अहिल्यानगरच्या संगमनेर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी मुंडे आणि त्यांच्या भेटीवर पुन्हा एकदा विधान केले.
"मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणी तत्कालीन मंत्री धनंजय मुंडेंना मी भेटायला गेलो होतो. त्यानंतर माझ्यावर टीका झाली. मात्र धनंजय देशमुख आणि मस्साजोगचे गावकरी यांनी सोबत असल्याचे दाखवून दिले. काहीही झाले तरी, पहिल्यापासून हे प्रकरण मी लावून धरले आहे आणि शेवटपर्यंत नेणारच आहे", असा पुनरुच्चार आमदार सुरेश धस यांनी केला.
आमदार धस हे अकोले इथं एका कार्यक्रमास निघालो होते. तत्पूर्वी त्यांनी राष्ट्रवादीचे (NCP) जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्या घरी भेट दिली. कपिल पवार यांच्या मातुःश्रींचे काही दिवसांपूर्वी निधन झाले, त्यामुळे संगमनेरातील त्यांच्या घरी आमदार धस यांनी सांत्वनपर भेट दिली. त्यावेळी त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
भाजप (BJP) आमदार धस म्हणाले, "आमचा जिल्हा क्रांतिकारी आहे. तेव्हा सरपंच संतोष देशमुख प्रकरण शेवटपर्यंत नेणार आहे. खरेतर धनंजय मुंडे यांच्यामुळेच मी बाहेर पडलो. आता त्यांचे मंत्रिपद गेल्यानंतर थयथयाट या करुन खोक्याचे प्रकरण बाहेर काढले. पण मी हटणार नाही, असा इशारा त्यांनी दिला".
राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना, 163 घरण्यांची राष्ट्रवादी असून, त्यांच्याच घरात पदे दिली जातात. खासदार बजरंग सोनवणे यांना पद देण्याची मी मागणी केली होती. त्यांनी इमानदारी राखत पक्ष सोडला नाही. 2005 साली दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना सोडून मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केवळ पाण्यासाठी गेल्याची आठवणही आमदार धस यांनी सांगितली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मराठवाड्यात आल्याचे सांगून, त्यांच्या माध्यमातून पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे. सध्याचे राजकारण खूप ढवळून निघाले आहे. आता कोण कोणत्या पक्षात जात आहे, हेच कळत नाही. त्यातूनच दोन नंबरची मते पडलेल्या उमेदवाराला घ्यायलाही आमच्यासह इतर पक्षांमध्ये स्पर्धा लागली आहे, असे देखील भाजप आमदार धस यांनी म्हटले.
लोकसभेला महाविकास आघाडीला यश मिळाले तर भाजपला कमी जागा मिळाल्या. मात्र, नंतर महाविकास आघाडीवाले, सगळेच हवेत गेले. हीच संधी पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत चांगले नियोजन करुन विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश मिळवून दिले. त्यामुळे लोकसभा व विधानसभा या दोन्ही निवडणुका वेगवेगळ्या असतात हे स्पष्ट होते, याकडे आमदार धस यांनी लक्ष वेधले.
याचबरोबर आपण महापुरुषांना जातीपातीत न अडकवता सर्वसमावेशक पाहावे तेव्हा आपण जयंती, पुण्यतिथीला सर्व समाजातील लोकांनी एकत्र आले पाहिजे. पण हे होत नाही हेच दुर्देव्य आहे. सरकारच्या कामकाजाबाबत विचारले असता, खरेतर फुकटच्या योजना बंदच केल्या पाहिजे. या योजनांमुळे लोक काम करत नाही. मजूर काम करत नाही. आता शेतकर्यालाच मजुराच्या घरी जावे लागत आहे. त्यामुळे फुकटच्या योजना पहिल्या बंद केल्या पाहिजे, असे सांगून लाडकी बहीण योजना चालू राहणार असल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.