Shri Shanaishwar corruption : 'शनैश्वर'च्या विश्वस्तांनी शक्कल लढवली; मोठ्या घोटाळ्याच्या चौकशीच्या नोटिसीवर मुंबईला वकील धाडला

Ahilyanagar Shanishingnapur Shanaishwar Trust Sends Lawyer to Mumbai Over Corruption Notice : अहिल्यानगरमधील नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर इथंल्या श्री शनैश्वर देवस्थात ट्रस्टमधील 500 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा मुद्दा पावसाळी विधिमंडळात चांगला तापला.
Shani Shingnapur scam
Shani Shingnapur scamSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar Shanishingnapur Trust : मुंबई इथल्या धर्मदाय आयुक्तांनी श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांना कार्यालयात हजर राहून म्हणणे मांडण्याची नोटिस दिली असली, तरी नोटिसमध्ये उल्लेख असलेल्या आपण किंवा आपल्या प्रतिनिधीने समक्ष हजर राहावे हा धागा पकडून सर्व विश्वस्तांनी मुंबईची वारी टाळली आहे.

नेमण्यात आलेले वकील आपले म्हणणे धर्मादाय आयुक्त कार्यालयात मांडणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र यावर देवस्थानचे अध्यक्ष व उपाध्यक्षांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले.

अहिल्यानगरमधील नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर इथंल्या श्री शनैश्वर देवस्थात ट्रस्टमधील 500 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा मुद्दा पावसाळी विधिमंडळात चांगला तापला. शनि दर्शनासाठी ऑनलाईन अ‍ॅप घोटाळ्याचा मुद्दा देखील गाजला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधिमंडळातून कायदेशीर कारवाईचे संकेत दिले. अ‍ॅप घोटाळ्यात सायबर पोलिसांनी फिर्यादी होत गुन्हा दाखल केला. एकाचवेळी दोन घोटाळ्यात तपासाला वेग आल्याने शनैश्वर देवस्थानचा कारभार चांगलाच चर्चेत आला आहे.

देवस्थान ट्रस्टमधील अनियमितता, बोगस कर्मचारी भरती, तसेच भ्रष्टाचाराच्या (Corruption) वाढत्या तक्रारीची खातरजमा राज्याचे धर्मादाय आयुक्त करीत आहेत. कार्यालयीन अधीक्षक सीमा केणी यांची सही असलेली नोटिस विश्वस्तांना मंगळवार (ता.15) रोजी समक्ष देण्यात आली होती. यामध्ये गुरूवारी सकाळी साडेअकरा वाजता कार्यालयात हजर राहण्याचे फर्मान होते. दोन दिवस विश्वस्त, अधिकारी व सल्लागार समितीवरील वकिलांची खलबतं झाल्यानंतर सर्व विश्वस्त न जाता फक्त वकिलांनी मुंबईला म्हणणे मांडण्यास जाण्याचे ठरले आहे.

Shani Shingnapur scam
Ujjwal Nikam Congress criticism : 'हरलो तरी मी विझलो नव्हतो'; खासदार उज्ज्वल निकम यांचा टोला

सध्या शनैश्वर देवस्थानात सुरू असलेल्या घडामोडींवर विश्वस्तांपैकी एकानेही प्रतिक्रिया दिलेली नाही. अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनीही मौन बाळगणं पसंद केलं आहे. दरम्यान, ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. के. दरंदले यांनी मुंबई धर्मदाय आयुक्त कार्यालयात नेमकं कुठल्या विषयावर म्हणणे द्यायचे हे माहीत नाही. विश्वस्त व सल्लागार वकिलात चर्चा झाल्यानंतर गुरूवारी विश्वस्तांतर्फे वकील जातील व धर्मादाय कार्यालयाचे म्हणणे ऐकून, त्यावर पुढे दिलेल्या मुदतीत सर्व विश्वस्त उत्तर देतील, असे सांगितले.

Shani Shingnapur scam
Ahilyanagar municipal corruption : आयुक्त डांगेच्या प्रतिक्रियेला राजकीय वास? ठाकरेंच्या शिलेदारांनं टायमिंग साधत दिला इशारा

सायबरकडून तपास सुरूच...

दरम्यान, सायबर पोलिसांनी शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात पाच कंपन्यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली असून, चार दिवसांत याप्रकरणी कोणतेही धागेदोरे समोर आले नसल्याची माहिती समोर आली. सायबर पोलिसांकडून तपास करीत असल्याचे एवढीच प्रतिक्रिया मिळाली.

चर्चाचा जोर...

अ‍ॅप घोटाळ्यात काही विश्वस्त, काही अधिकारी, कर्मचारी व पुरोहितांचा मोठा लवाजमा असल्याचा सूर तक्रारदार आहे. ऑनलाइन पूजा, साडेसाती निवारण पूजा, तेल अभिषेक व शनिमूर्तीचे लाइव्ह दर्शनाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे. हे काम पुरोहितांना हाताशी धरल्याशिवाय शक्य नसल्याने यामध्ये सोनईमधील पुरोहित व त्यांच्या वाढलेल्या संपत्तीविषयी उघड चर्चा होताना दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com