
Mahayuti government controversy : राज्यात अवैध सुगंधी तंबाखू, गुटखा अन् सुपारीवरून, सत्ताधारी भाजप महायुतीला सरकारला त्यांच्यात आमदारांनी आरसा दाखवला.
अहिल्यानगर श्रीगोंद्यातील भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी अधिवेशनात सभापतींनाच चॅलेंज करत, 'चला आता माझ्याबरोबर, संपूर्ण विधानभवनामध्ये तपासणी करू. सुगंधी सुपारी, गुटखे, सुंगधी तंबाखू, मिळतील की, त्याला माप राहणार नाही. म्हणजे आपल्या बुडाखालीच ही अवस्था आहे, तर राज्यात काय परिस्थिती असेल?', असा सवाल आमदार विक्रम पाचपुते यांनी केला.
अहिल्यानगरच्या श्रीगोंद्यातील (Shrigonda) आमदार विक्रम पाचपुते अवैध सुगंधी तंबाखू, गुटखा अन् सुपारीवरून आज विधिमंडळावरून मुद्दा उपस्थित केला. आमदार पाचपुते यांनी सभापतींनाच विधानभवनात तपासणी करू, असे सांगून माप राहणार नाही. म्हणजेच आपल्याच बुडाखाली ही अवस्था आहे, याकडे लक्ष वेधले.
भाजपचे (BJP) आमदार विक्रम पाचपुते म्हणाले, "सरकारी कार्यालयात गेल्यावर सगळीकडे थुंकलं आहे. पान गुटखा, सुगंधी तंबाखू यावर गेल्या वर्षभरापासून बंदी आहे. मग हे थुंकतात कुठून. थुंकायला पान मसाला येतोच कुठून. याचे कारण एकच आहे. अभिनेते टीव्हीवर जाहिरात करतात". ऊंचे लोग ऊंची पसंद, काय चाललंय काय? दुर्दैव्य असं आहे की, याला आपण रोखतच नाही, असेही पाचपुते यांनी म्हटले.
'आता आपल्याकडे सुगंधी सुपारी देखील विक्रीला बंदी आहे. चला माझ्याबरोबर आता तपासणी करू. संपूर्ण विधानभवनामध्ये, सुगंधी सुपारी, गुटखे, सुंगधी तंबाखू, मिळतील की, माप राहणार नाही. म्हणजे आपल्या बुडाखालीच ही अवस्था आहे. राज्यात काय परिस्थिती असेल', असा सवाल विक्रम पाचपुतेंनी केला.
'एका सुगंधी पान मसाला उत्पादक कंपनीचा दाखला देताना, म्हणते काय, तर जुबां केसरी, हिंदुत्ववादी आमच्या कार्यकर्त्यांनी यांची सर्व दालन फोडून काढली पाहिजे, केसरी रंगाला बदनाम करत आहेत. काय अवस्था चाललेली आहे', अशी संताप विक्रम पाचपुतेंनी व्यक्त केला. त्यात कणभर केसर नाही. आणि आमच्या तरुण पिढीला सांगितलं जात की, त्या गुटख्यामध्ये त केसर आहे. केसर गुटख्यापेक्षा स्वस्त आहे. नुसतं केसर खायला दिलं, तर आपल्याकडे कुपोषित बालकं तयार होणार नाही, असेही विक्रम पाचपुतेंनी म्हटले.
सुगंधी तंबाखू, गुटखा, सुपारी थुंकणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याबाबत मंत्र्यांनी आश्वासित केल्याचं आमदार विक्रम पाचपुतेंनी सांगितले. अधिकारी योग्यपद्धतीने काम करत नाही, त्यावर कारवाई झाली पाहिजे. निलंबित करा. कारवाई होत नसेल, तर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून द्या. काम होणं गरजेचे आहे. सरकारी कार्यालयातील भिंती पिचकाऱ्या मारून खराब केल्या आहेत. ज्यांच्यावर अंमलबजावणीची जबाबदारी आहे, तेच भक्षक झाले आहेत.
अधिकारी जेवढे जबाबदार आहेत, तेवढेच सेलिब्रिटी देखील जबाबदार आहेत. बंद असलेल्या पदार्थांची रितसर जाहिरात करत आहेत. गुटखा अन् पानमसाल्याची केसरी रंगाशी तुलना करता? केसरी रंग किती पावन आहे. या बेकायदेशीर जाहिराती आजच्या आज महाराष्ट्रात थांबल्या पाहिजेत. अशा जाहिरातांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी, तशी न झाल्यास मी कायदेशीर नोटीस बजावणार असल्याचा इशारा विक्रम पाचपुतेंनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.