BJP Monika Rajale Vs NCP Chandrashekhar Ghule : राजळे-घुले-काकडे यांच्यात 'घमासान'; महायुतीला ब्रेक बसणार? विजयाचं गणितं जुळवताना दमछाक होणार

Ahilyanagar zilla parishad & Panchayat Samiti Election 2025: Shevgaon BJP Monika Rajale vs NCP Chandrashekhar Ghule : शेवगाव पंचायत समितीचे गणनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली असून, इच्छुकांनी निवडणुकीच्या तयारीला वेग घेतला आहे.
BJP Monika Rajale Vs NCP Chandrashekhar Ghule
BJP Monika Rajale Vs NCP Chandrashekhar GhuleSarkarnama
Published on
Updated on

Panchayat Samiti election Shevgaon : शेवगाव पंचायत समितीचे गणनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. एकूण 8 गणांपैकी दहिगावने, मुंगी व बोधेगाव-सर्वसाधारण महिला, घोटण व लाडजळगाव - सर्वसाधारण, भातकुडगाव-अनुसूचित जाती व्यक्ती, अमरापूर नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, तर खरडगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आला.

यामुळे महायुतीमधील भाजप व राष्ट्रवादी या दोन पक्षांतील दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना पंचायत समितीमध्ये पाऊल ठेवण्याची संधी मिळणार आहे. शेवगावमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार चंद्रशेखर घुले आणि भाजप आमदार मोनिका राजळे यांच्या धुरळा उडणार आहे. विधानसभेत अपक्ष निवडणूक लढविताना घुलेंना पराभव पत्कारावा लागला होता. तसंच शिवाजीराव काकडे आणि त्यांच्या पत्नी हर्षदा काकडे कोणती रणनीती आखतात, याकडे लक्ष असणार आहे.

शेवगाव इथल्या तहसील कार्यालयात निवडणूक (Election) निर्णय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी अतुल चोरमारे, तहसीलदार आकाश दहाडदे, नायब तहसीलदार राजेंद्र बकरे, मंडलाधिकारी श्रीनिवास आव्हाड, सुरेश बर्डे यांच्या उपस्थितीत गणनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आली.

प्रथम लोकसंख्येनुसार भातकुडगाव गणाची सोडत काढण्यात आली. तो अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. दहिगावने - सर्वसाधारण महिला, घोटण-सर्वसाधारण, मुंगी-सर्वसाधारण महिला, बोधेगाव- सर्वसाधारण महिला, अमरापूर नागारिकांचा मागास प्रवर्ग, खरडगाव-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, लाडजळगाव- सर्व साधारण, असे आरक्षण (Reservation) पडले. आदित्य बैरागी, युवराज काते या विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठीद्वारे आरक्षण काढण्यात आले. या अगोदर सभापतिपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले झाल्याने पंचायत समितीमध्ये प्रत्येकी चार पुरुष-महिलांना संधी मिळणार आहे.

BJP Monika Rajale Vs NCP Chandrashekhar Ghule
BJP vs NCP Shrigonda : अजितदादांची सात जणांची 'टीम' Vs भाजप; श्रीगोंद्यात महायुतीत 'राडा' होणार?

चंद्रशेखर घुलेंचे राजकीय डावपेच

2017 साली झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व आठ जागांवर माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निर्विवाद वर्चस्व मिळवले होते. त्यामध्ये डॉ. क्षितिज घुले, मंगेश थोरात, मीरा लांडे, मनीषा कोळगे, कृष्णा पायघन, अनिता क्षीरसागर, नूतन भोंगळे व शिवाजी नेमाणे विजयी झाले होते. पाच वर्षे सभापतिपदावर डॉ. घुले यांना संधी देण्यात आली होती, तर उपसभापतिपदावर पहिल्या टर्ममध्ये शिवाजी नेमाणे, तर दुसऱ्या टर्ममध्ये नूतन भोंगळे यांना संधी देण्यात आली.

BJP Monika Rajale Vs NCP Chandrashekhar Ghule
Balasaheb Thorat Vs Amol Khatal : राखीव जागांमुळे समीकरणे बदलली; तरीही थोरात-खताळ-तांबेंमध्ये घमासान, विखे पितापुत्र संगमनेरच्या मैदानात पुन्हा उतरणार?

जनशक्ती झुंझवणार

2022 रोजी मुदत संपल्यानंतर निवडणुका इतर मागास प्रवर्ग आरक्षणाच्या न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याने पंचायत समितीवर प्रशासक राज होते. प्रमुख दावेदार असलेले भाजप आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष सध्या राज्यात सत्तेवर आहेत. मात्र, या निवडणुकीमध्ये आमदार मोनिका राजळे व माजी आमदार चंद्रशेखर घुले हे दुसऱ्या फळीतील कोणत्या कार्यकर्त्यांना संधी देतात, तर जनशक्ती विकास आघाडीचे प्रमुख ॲड. शिवाजीराव काकडे हे पत्नी हर्षदा काकडे यांच्यासह कोणाला रिंगणात उतरवतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, शिवसेना, शिवसेना ठाकरे गट या पक्षांकडूनही अनेक जण निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत.

गणनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे

दहिगावने- सर्वसाधारण महिला, घोटण- सर्व साधारण, मुंगी- सर्वसाधारण महिला, बोधेगाव- सर्वसाधारण महिला, भातकुडगाव- अनुसूचित जाती, अमरापूर- नागरिकांचा मागास प्रवर्ग, खरडगाव- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, लाडजळगाव- सर्वसाधारण.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com