IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर यांच्याकडे दोन दिव्यांग प्रमाणपत्र; नाॅन क्रिमीलेअरची चौकशी सुरू

IAS Pooja Khedkar Updates : प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांच्या कारनाम्याची दिवसेंदिवस एक-एक माहिती समोर येत आहे. वादग्रस्त पूजा खेडकर यांना जिल्हा रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र घेतल्याचे समोर आले.
IAS Pooja Khedkar
IAS Pooja KhedkarSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना जिल्हा रुग्णालयातून दोन दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त केल्याची नोंद आढळली आहे. अभिलेख तपासणीत ही बाब समोर आली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. संजय घोगरे यांनी दिली.

प्रशिक्षणार्थी आयएएस (IAS) पूजा खेडकर यांच्या कारनाम्याची दिवसेंदिवस एक-एक माहिती समोर येत आहे. वादग्रस्त पूजा खेडकर यांना जिल्हा रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र घेतल्याचे समोर आले. यात त्यांनी दोन प्रमाणपत्र मिळवली आहेत. जिल्हा रुग्णालयाने पूजा खेडकर यांनी मिळवलेल्या प्रमाणपत्राची तपासणी केली. त्यानुसार पूजा खेडकर यांना 2018 मध्ये दिव्यांग आणि 2020 मध्ये मानसिक आजारी असल्याचे प्रमाणपत्र घेतल्याची नोंद आहे. वैद्यकीय मंडळाने 2021 मध्ये दोन्ही प्रमाणपत्राचे एकत्रिकरण केल्याचे आढळले आहे.

IAS Pooja Khedkar
IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर यांच्या 'कार'नाम्यातील ऑडी पोलिसांच्या ताब्यात

पुणे (Pune) जिल्हाधिकारी कार्यालयातून वाशिम जिल्ह्यात प्रशिक्षणासाठी बदली करण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर त्यांच्या वागणुकीमुळे चांगल्याच चर्चेत आल्या. यानंतर त्यांच्या अनेक कारनामे समोर येऊ लागले आहेत. पूजा खेडकर यांचे दिव्यांग प्रमाणपत्राबरोबर त्यांचे नाॅन क्रिमीलेअर देखील संशयाच्या भोवऱ्यात आले आहे.

पूजा खेडकर यांनी एका मुलाखतीमध्ये आईवडील विभक्त असल्याचा दावा केला होता. परंतु पूजा खेडकर यांचे वडिलांनी निवडणुकीत कुटुंब अविभक्त कुटुंब असले म्हटले आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित झालेत. तसेच पूजा खेडकर यांनी सादर केलेले नाॅन क्रिमीलेअरचे प्रमाणपत्र वडिलांच्या उत्पन्नाशी जुळत नसल्याचे दिसते.

IAS Pooja Khedkar
IAS Pooja Khedkar : वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल, कारण...

पूजा खेडकर यांच्या वडिलांनी लोकसभा निवडणूक लढविताना एकूण उत्पन्न 40 कोटीहून अधिक असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. परंतु नाॅन क्रिमीलेअरची मर्यादा आठ लाख रुपयांपेक्षा कमी असल्याची अट असते. त्यामुळे पूजा खेडकर यांचे नाॅन क्रिमीलेअर प्रमाणपत्र वादात सापडले आहे. या संदर्भात महसूलच्या पाथर्डी विभागीय कार्यालयाकडून तपासणी सुरू असल्याची माहिती समोर आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com