Ahmednagar News : आयुक्त पंकज जावळे या कारणानं अ‍ॅक्शन मोडवर...

AMC News : नगर शहरातील अनधिकृत फलकांबाबत महापालिकेने सर्वेक्षण केले. यात 83 अनधिकृत फलक आढळले. याशिवाय 44 जाहिरात फलकांना परवाना मुदत संपलेली आहे. एकूण 127 अनधिकृत फलक मालकांना नगर महापालिकेने नोटीस काढली आहे.
Pankaj Jawale
Pankaj Jawalesarkarnama
Published on
Updated on

Nagar News : मुंबईतील दुर्घटनेनंतर नगर महापालिका (AMC) शहरातील जाहिरात फलकांबाबत गंभीर झाली आहे. आयुक्त डाॅ. पंकज जावळे शहरातील अनधिकृत फलकांबाबत अ‍ॅक्शन मोडवर आहे. नगर शहरातील अनधिकृत फलक सोमवारपासून हटवण्यास सुरूवात करण्यात येणार आहेत.

नगर शहरातील अनधिकृत फलकांबाबत महापालिकेने सर्वेक्षण केले. यात 83 अनधिकृत फलक आढळले. याशिवाय 44 जाहिरात फलकांना परवाना मुदत संपलेली आहे. अशा एकूण 127 अनधिकृत फलक मालकांना नगर महापालिकेने (AMC) नोटीस काढली आहे. नगर शहरात सर्वेक्षणात 384 परवानाधारक जाहिरात फलक आढळले. 127 अनधिकृत फलकांमुळे महापालिकेचे (Corporation) उत्पन्न देखील बुडाले आहे. नगर महापालिकेला जाहिरात फलकांच्या माध्यमातून दरवर्षी सात ते आठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pankaj Jawale
Minister Radhakrishna Vikhe News : चारा छावण्या सुरू करण्याची गरज नाही, मंत्री विखेंनी सांगितले मोठे कारण...

मुंबईतील (Mumbai) दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासक डाॅ. पंकज जावळे यांनी शहरातील अनधिकृत जाहिरात फलकांचे सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला होता. यानुसार महापालिकेच्या चारही प्रभाग समितीच्या कार्यालयामार्फत सर्वेक्षण करून घेण्यात आले. या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार सावेडी प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत 38, माळीवाडा मध्यवर्ती शहर कार्यालयाच्या हद्दीत 15, झेंडीगेट कार्यालयाच्या हद्दीत 21 आणि बुरुडगाव हद्दीत नऊ, असे 83 अनधिकृत जाहिरात फलक आढळले. तसेच परवाना संपलेले 44 फलक आढळून आले. 127 Unauthorized Hording in Ahmednagar city

या सर्व अनधिकृत जाहिरात फलकांच्या (Hoarding) मालकांना महापालिका प्रशासाने नोटिस बजावली आहे. आता महापालिका सोमवारपासून हे फलक हटवणार आहे. तसेच इमारत, रस्त्यालगत उभारलेल्या जाहिरात फलकांची उभारणी नियमानुसार झाली आहे का, याची तपासणीसाठी स्ट्रक्चरल आॅडिट होणार आहे. ही कारवाई आठ दिवसात होईल, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Pankaj Jawale
Pune Porsche Accident : आमदार प्राजक्त तनपुरे म्हणाले, "स्वप्न चिरडणारा श्रीमंत बापाचा लेक दोषीच..."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com