Ahmednagar News : नातवासाठी ८५ वर्षीय आजीचा पोलीस अधीक्षक कार्यालयातच आत्मदहनाचा प्रयत्न; काय आहे प्रकरण ?

Corona And Police : कोरोनात निधन झालेल्या पोलीस मुलाच्या जागेवर नातवाच्या नोकरी देण्याची मागणी
Ahmednagar News : नातवासाठी ८५ वर्षीय आजीचा पोलीस अधीक्षक कार्यालयातच आत्मदहनाचा प्रयत्न; काय आहे प्रकरण ?
Published on
Updated on

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar : पोलीस दलात कार्यरत मुलगा व सेवानिवृत्त सूनचे कोरोनामध्ये निधन झाले. मुलाच्या जागेवर लहान नातूला अनुकंपा तत्वावर हजर करून घेण्यासाठी प्रशासनाकडून टाळाटाळ होतेय, असा आरोप करत ८५ वर्षीय आजीने थेट अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

नगर पाथर्डी रोड भिंगार वाल्मिकनगर येथिल८५ वर्षाच्या आजी सुलोचना गणपत केदारे यांनी नातवाला पोलीस खात्यात समाविष्ट करून घेण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयसमोर स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी प्रसंगावधान राखत पोलिसांनी आजींना रोखले आणि पुढील अनर्थ टळला.

Ahmednagar News : नातवासाठी ८५ वर्षीय आजीचा पोलीस अधीक्षक कार्यालयातच आत्मदहनाचा प्रयत्न; काय आहे प्रकरण ?
MLA Sunil Shelke In Session : 'इर्शाळवाडी'नंतर मावळातील भूस्खलनाचा प्रश्न ऐरणीवर; आमदार शेळके सभागृहात गरजले

मुलाच्या जागी नातवाला रूजू करून घेण्यासाठी शासनासह जिल्हा अधिक्षकांसह महासंचालकाकडे वारंवार विनंती अर्ज देण्यात आले. त्यावर अद्यापही कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही. यानंतर आजी मुंबई येथील विधानभवन येथे १८ जुलैला आमरण उपोषण करण्याचा इशाराही दिला होता. मात्र परवानगी नाकारल्याने आजी सुलोचना गणपत केदारे यांनी आत्मदहन करणार असल्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदनाद्वारे कळवले होते. मात्र याकडेही दुर्लक्ष झाल्यानंतर आजींनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. (Ahmednagar News)

पोलीस दलात कार्यरत असलेले विठ्ठल केदारे व सेवानिवृत्त झालेल्या आईचे एप्रिल २०२१ मध्ये कोरोना महामारीत निधन झाले. पोलीस अधीक्षक कार्यालयातील आस्थापना विभागातील कर्मचारी व हेड क्लार्क यांच्यासोबत मोठ्या नातवाच्या नोकरीबाबत वाद झाला. यानंतर सुनावणी झाल्यानंतर केलेल्या पैशाची मागणी पूर्ण न केल्याने मोठ्या नातवाला अनुकंपा तत्वावर हजर करून घेण्यास टाळाटाळ केल्याचाही आरोप सुलोचना केदारे यांनी केला आहे.

Ahmednagar News : नातवासाठी ८५ वर्षीय आजीचा पोलीस अधीक्षक कार्यालयातच आत्मदहनाचा प्रयत्न; काय आहे प्रकरण ?
Uddhav Thackeray Birthday : 'मातोश्री'च्या अंगणातही उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचं 'झिरो सेलिब्रेशन'

यानंतर आजींनी लहान नातू विक्रम विठ्ठल केदारे याचा विनंती अर्ज शासनास पाठविलेला आहे. शासनाकडून अहवाल प्राप्त झालेला असूनही पोलीस दलात त्याला हजर करून घेतले जात नाही. दोन्ही नातू बेरोजगार असल्यामुळे माझा वैद्यकिय खर्च व कुटुंब चालविण्यासाठी काहीही साधन उपलब्ध नाही.

मुलगा व सून राहिले नसल्याने कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. यासाठी लहान नातू विक्रमला पोलीस सेवेत घेण्याची मागणी सुलोचना केदार यांची आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांच्याशी 'सरकारनामा'च्या प्रतिनिधीने मोबाईल,फोनद्वारे संपर्क साधला मात्र ते उपलब्ध झाले नसल्याने अधिकची माहिती मिळू शकली नाही.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com