Nitesh Rane : आमदार राणेंच्या अडचणी वाढल्या; सात गुन्ह्यांच्या तपासाला वेग येणार

Ahmednagar Police Will Investigate Seven Different Cases Filed Against Nitesh Rane: भाजप आमदार नीतेश राणे यांनी हिंदुत्ववादी मोर्चात मुस्लिमांविषयी केलेल्या विधानांवरून वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झालेत.
Nitesh Rane
Nitesh RaneSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar Political News: भाजप आमदार नीतेश राणे त्यांच्या भडकावू भाषणांमुळे चर्चेत असतात. परंतु आता त्यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी होऊ लागली आहे. पक्षातील नेत्यांनी देखील त्यांना धार्मिक मुद्यांवर भडकावू विधान न करण्याची तंबी दिली असली, तरी त्याला खूप उशिर झालाय.

कारवाईची मागणी जोर धरू लागल्यानं नीतेश राणे यांच्याभोवती कायद्याचा सापळा घट्ट होऊ लागला आहे. त्यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या जिल्ह्यात दाखल सहा गुन्हे अहमदनगर पोलिसांकडे तपासासाठी एकत्रित वर्ग झाले आहे.

भाजप (BJP) आमदार नीतेश राणे (रा. कणकवली, सिंधुदुर्ग) व त्यांच्या अहमदनगरमधील सभा व मोर्चाचे आयोजक, हिंदुत्ववादी कार्यकर्ते दिंगबर गेंट्याल (रा. श्रमिकनगर, नगर) याच्याविरुद्ध राज्यात ठाणे, नागपूर, बीड जिल्ह्यात एकूण सहा गुन्हे दाखल झालेत.

हे गुन्हे तपासासाठी अहमदनगरमधील तोफखाना पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहेत. आमदार राणे आणि दिंगबर गेंट्याल या दोघांविरुद्ध अहमदनगरमधील तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. हा गुन्हा मिळून, एकूण सात गुन्ह्यांचा तपास होणार आहे.

Nitesh Rane
ADCC Bank Bharati : 696 जागांवर भरती, आरक्षण गायब; जितेंद्र आव्हाडांकडून प्रश्नांचा भडीमार

सरला बेटावरील मठाधिपती रामगिरी महाराज यांनी काही दिवसांपूर्वी मुस्लिमांविषयी वादग्रस्त विधान केले होते. या विधानाचा निषेध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात मुस्लिम रस्त्यावर उतरून कारवाईची मागणी करत होते.

रामगिरी महाराज यांच्याविरोधात राज्यभरात वेगवेगळ्या पोलिस (Police) ठाण्यांमध्ये 58 गुन्हे दाखल झाले आहेत. अशावेळी रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी अहमदनगर शहरासह विविध ठिकाणी मोर्चे काढले.

Nitesh Rane
NCP News : मेहबूब शेख यांच्यावर टीका करताना शिंदे गटाच्या आमदाराची जीभ घसरली

भाजप आमदार नीतेश राणे यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर, कर्जत, श्रीरामपूरमध्ये मोर्चे झाले होते. अहमदनगर आणि श्रीरामपूरमध्ये आमदार राणे यांची सभा झाली होती. मुस्लिमांविषयी या सभेत अपशब्द वापरून, मारहाणीचे विधान करणे, मुस्लिम धर्मगुरूंना घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देणे, दोन समाजात तेढ निर्माण होईल, असं विधानं करणे, चिथावणी देणारे भाषण करणे, धार्मिक भावना दुखवणे, अशा वेगवेगळ्या मुद्यांवरून आमदार राणेंविरुद्ध अहमदनगरमधील तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.

महिला पोलिस अधिकारी करणार तपास

अहमदनगरमधील भाषणाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर आमदार राणे आणि आयोजक दिंगबर गेंट्याल या दोघांविरुद्ध राबोडी (जि. ठाणे), मुंब्रा, भोईवाडा, नागपूरमधील कामठी, बीडमधील परळी पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र, असे एकूण सात गुन्हे दाखल झाले आहेत. हे गुन्ह्यांच्या एकत्रित तपास आता अहमदनगरमधील तोफखाना पोलिस करणार आहेत. पोलिस उपनिरीक्षक शुभांगी मोरे या गुन्ह्यांचा तपास करणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com