Ahmednagar Lok Sabha Election 2024 Result : नीलेश लंकेंना मोठा धक्का; प्राजक्त तनपुरे, रोहित पवारांचा गजहब

Prajakta Tanpure and Rohit Pawar Politics : महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांना शरद पवार यांच्या पक्षातील आमदार प्राजक्त तनपुरे आणि आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघातून मताधिक्य घटल्याने मोठा धक्का मानला जात आहे.
Nilesh Lanke Rohit Pawar Prajakt tanpure
Nilesh Lanke Rohit Pawar Prajakt tanpure Sarkarnama

Ahmednagar Election Result 2024 Live Updates : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे पहिला फेरीचा कल स्पष्ट झाला असून, भाजपचे उमेदवार सुजय विखे यांना 190 मतांनी आघाडीवर आहेत. राहुरीतून विखे सर्वाधिक 6 हजार 440 मते मिळाली आहे.

विशेष म्हणजे राहुरीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या बालेकिल्ल्यातून भाजपच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाले. त्यामुळे राहुरीत आमदार तनपुरेंनी नेमके काय केले? असा प्रश्न शरद पवार यंत्रणेला पडला आहे.

महाविकास आघाडीचे राज्यात सरकार आल्यावर शरद पवार (Sharad Pawar) यांनी पहिल्यांदा निवडून आलेल्या प्राजक्त तनपुरे यांना मंत्रीपदावर संधी दिली. पक्षात फूट पडल्यानंतर याची भरपाई म्हणून आमदार तनपुरे यांनी शरद पवार यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला.

विखे आणि तनपुरे यांचा संघर्ष तीव्र आहे. त्यामुळे तनपुरे यांच्याकडून शरद पवार यांना लोकसभा निवडणुकीत उमेदवाराला चांगले मताधिक्य मिळवून देतील, अशा अपेक्षा आहेत. तशी शरद पवार यांची सभा देखील राहुरीत झाली होती. अशातच पहिल्याच फेरीत तनपुरे यांच्या राहुरीतून सुजय विखे यांचा जबरदस्त मते मिळाली.

खासदार सुजय विखे यांना 6 हजार 440 मते मिळाली. तुलनेत नीलेश लंके यांना 3 हजार 862 मते मिळाली. इतर तालुक्यात पाच विधानसभा मतदारसंघात नीलेश लंके यांना चांगले मते मिळाली आहेत.

श्रीगोंद्यात लंके यांना 2 हजार 664 तर, विखे यांना 2 हजार 13, शेवगावमध्ये लंके यांना 4 हजार 872 तरा, विखे यांना 4 हजार 21 मते मिळाली. लंके यांचा बालेकिल्ला असलेल्या पारनेर विधानसभा मतदारसंघातून लंके यांना 4 हजार 475 तर, विखे यांना 2 हजार 925 मते मिळाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nilesh Lanke Rohit Pawar Prajakt tanpure
Nilesh Lanke : नगर हबकलं, नीलेश लंकेंच्या कार्यकर्त्यांचा मतमोजणी केंद्राला रात्रभर खडा पहारा...

आमदार रोहित पवार यांच्या कर्जत जामखेडमध्ये देखील लंके यांचे मताधिक्य घसरले आहे. लंके यांना तिथे 2 हजार 13 मते मिळाली आहेत तर विखे यांना तिथे 2 हजार 669 मते मिळाली आहे. नगर शहर मतदारसंघात लंके यांना 368 तर, विखे यांना 376 मते मिळाली आहेत.

Nilesh Lanke Rohit Pawar Prajakt tanpure
Radhakrishna Vikhe On Balasaheb Thorat : पुत्राची खासदारकी धोक्यात; मंत्री विखे संतापून म्हणाले, 'बाळासाहेब थोरातांना शरम वाटली पाहिजे'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com