Ahmednagar News : आर्थिक उत्पन्नाने केवळ महापालिकाच श्रीमंत असतात असे नव्हे. ग्रामपंचायती पण श्रीमंत समजल्या जातात. नगर जिल्ह्यातील श्रीमंत समजल्या जाणाऱ्या शिर्डी जवळील निमगाव को-हाळे ग्रामपंचायतमध्ये नवनिर्वाचित सरपंच कैलासराव कातोरे, उपसरपंच तात्या आण्णा गायकवाड यांनी पदभार स्वीकारलाय, तोही अशाच श्रीमंती थाटातच!! पदभार घेण्यास जाताना नवनिर्वाचित पदाधिकारी, सदस्य महिला-पुरुष नागरिक यांनी फेटे बांधून भव्य डीजेच्या दणदणाटात मिरवणूक काढली.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना उत्साही समर्थकांनी खांद्यावर घेत नाचवले आणि जोरदार घोषणांनी परिसरही दणाणून सोडला. जनसेवा ग्रामविकास मंडळांच्या कार्यकर्तांत्यानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा पदभार सोहळा पार पाडला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अहमदनगर जिल्ह्यातील मोठे आर्थिक उत्पन्न असल्याने चर्चेत असणाऱ्या शिर्डी जवळील निमगाव को-हाळे ग्रामपंचायत मध्ये नवनिर्वाचित सरपंच कैलासराव कातोरे , उपसरपंच तात्या आण्णा गायकवाड यांनी आपल्या पदभार स्विकारताना मोठा तामझाम केला. एखादा आमदार निवडून आल्यानंतर विजयाचा जसा जल्लोष कार्यकर्ते करतात, गुलालाची उधळण करतात त्याच पद्धतीने पदभार स्वीकारण्यास जाताना सोहळा साजरा झाला. यावेळी डीजेच्या तालावर गावातील महिलांनासह पुरुषांनी तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी ठेका धरत एकच जल्लोष केला.
नुकत्याच नगर जिल्ह्यात 198 ग्रामपंचायतीच्या निवडणूका पार पडल्या. यात राहाता तालुक्यातील निमगाव को-हाळे ग्रामपंचायत मध्ये महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या जनसेवा मंडळाच्या पाच सदस्यासह सरपंचपदी कैलास कातोरे हे विजयी झाले. तर त्याचबरोबर त्यांच्या विचारधारेचे सुजय पर्व पॅनलचे तात्या आण्णा गायकवाड हे विजयी झाले. आज कातोरे यांनी सरपंच पदाचा पदभार स्विकारल्यानंतर एकाच विचार धारेचे जनसेवामंडळ आणि सुजय पर्व एकत्र येऊन बहूमत सिद्ध करत उपसरपंच पदाचा मान सुजय पर्व पॅनलला देत तात्या गायकवाड यांच्या गळ्यात उपसरपंच पदाची माळ घातली.
विखे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही पॅनल काम करत असून, यापुढे फक्त विकासाचा ध्यास असेल असे मत यावेळी सरपंच कातोरे यांनी व्यक्त केला. राहाता-कोपरगाव-संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायत आखाड्यात यंदा विखे,थोरात, काळे, कोल्हे या गटांनी एकमेकांच्या तालुक्यात हस्तक्षेप करत आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला.
राहाता तालुक्यातील जवळपास चार मोठ्या लोकसंख्येच्या ग्रामपंचायती भाजपच्या विवेक कोल्हेनीं ताब्यात घेतल्या. तर विखेंनी थोरातांच्या संगमनेर तालुक्यात आपली राजकीय चुणूक दाखवली. एकूणच या राजकीय रस्सीखेचात आता निवडून आलेल्या ठिकाणी जोमात उपसरपंच पदाच्या निवडणुका आणि पद्ग्रहण सोहळे पार पडत आहेत.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.