
AIMIM Meeting Ahilyanagar: 'AIMIM'चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि इम्तियाज जलील यांच्याभोवती कोल्हापूरमध्ये मोठा वाद झाला. तसंच अहिल्यानगर शहरात देखील 'आय लव्ह मोहम्मद' रांगोळीतून मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखवण्याचा प्रकारानंतर हिंसाचार उसळला.
या सर्व पार्श्वभूमीवर 'AIMIM'चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांची पहिल्यादांच अहिल्यानगरमध्ये सभा होत आहे. या सभेला परवानगी मिळणार की नाही मिळणार, हा संभ्रम असतानाच, तो आता दूर झाला आहे. अहिल्यानगर पोलिसांनी असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेला परवानगी दिली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर अहिल्यानगरमध्ये 'AIMIM'च्या गेल्या काही दिवसांपासून राजकीय हालचालींना वेग आला आहे. अहिल्यानगर शहरातील मुस्लिम बहुभाात सत्ताधाऱ्यांची हक्काची निवडून येणाऱ्या माजी नगरसेवकांनी 'AIMIM'मध्ये प्रवेश केला.
शहरासह जिल्ह्यात अनेक भागात 'AIMIM' स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या तोंडावर ताकद वाढवत आहे. यातच 'AIMIM'चे प्रमुख असदु्द्दीन ओवैसी आज सभा होत आहे. यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातील अनेकांचे प्रवेश या सभेनिमित्ताने घडणार आहे.
'AIMIM'चे प्रमुख असदुद्दीन ओवैसीच्या (Asaduddin Owaisi) सभेपूर्वी, कालच अहिल्यानगरमध्ये मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखवण्याचा प्रकार झाला. यातून अहिल्यानगर शहरात हिंसाचार उफाळला. 'आय लव्ह मोहम्मद' रांगोळी रस्त्यावर काढण्यात आली. या प्रकरणाची निगडीत वेगवेगळ्या चार फिर्यादी दाखल झाले आहेत. काल दिवसभर अहिल्यानगर शहरात तणावाचे वातावरण होते.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक स्वतः अहिल्यानगर शहरात दाखल झाले. ते रात्री उशिरापर्यंत परिस्थितीचा आढावा घेत होते. असदुद्दीन ओवैसी यांची ज्या भागात, मुकुंदनगरमध्ये होत असलेल्या सभास्थळाची देखील पाहणी केली. या दरम्यान, हिंसाचाराला कारणीभूत असलेल्या रात्री उशिरापर्यंत धरपकड करण्यात आली. याशिवाय 'AIMIM'च्या काही पदाधिकाऱ्यांना देखील ताब्यात घेण्यात आलं आहे.
'AIMIM'चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी काल कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यांच्याबरोबर इम्तियाज जलील देखील होते. तिथं हिंदुत्ववादी संघटनांना मोठा राडा घातला. यातच अहिल्यानगरमध्ये हिंसाचाराची घटना झाली.
त्यामुळे मुकुंदनगर भागात आज सायंकाळी सात वाजता होणाऱ्या सभेत असदुद्दीन ओवैसी नेमकं काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असदुद्दीन ओवैसी यांच्या भाषणाची शैली आक्रमक आहे. यातच कालच्या हिंसाचाराच्या घटनेमुळे पोलिसांनी अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या भागात पोलिस बंदोबस्त वाढून ठेवला आहे.
असदुद्दीन ओवैसी सभेपूर्वी दुपारी 3 वाजता उलमा बोर्डच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. तिथं मुस्लिमांच्या धर्मगुरूंशी संवाद साधणार आहेत. यानंतर पत्रकार परिषद झाल्यानंतर सभेच्या ठिकाणी रवाना होतील.
प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील, महासचिव समीर साजिद, कार्याध्यक्ष फारूख शाबदी, राष्ट्रीय प्रवक्ते वारीस पठाण, मालेगावचे आमदार मुफ्ती इस्माईल, महासचिव अतिक अहमद, सहसचिव सैफ पठाण, शफीऊला काझी यांच्यासह महाराष्ट्रातील 'AIMIM'चे प्रमुख पदाधिकारी सभेला उपस्थित राहतील, अशी माहिती डाॅ. परवेज अशरफी यांनी दिली.
या सभेला अहिल्यानगर जिल्ह्यासह नाशिक, बीड, छत्रपती संभाजीनगर, पुणे, जालना, जळगाव, धुळे, मालेगाव जिल्ह्यातून कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे. अहिल्यानगर शहरात पहिल्यादांच 'AIMIM'चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्या उपस्थित होत असलेली ही सभा रेकाॅर्डब्रेक होईल, असा दावाही डाॅ. परवेज अशरफी यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.