धुळे शहराला अमृत योजनेंतर्गत २५० कोटी द्यावे

आमदार फारुक शाह यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी
MLA Farukh Shaikh
MLA Farukh ShaikhSarkarnama
Published on
Updated on

धुळे : अमृत योजनेंतर्गत धुळे (Dhule) महापालिका क्षेत्रासाठी २५० कोटी रुपये उपलब्ध करावेत अशी मागणी शहराचे आमदार फारुक शाह (Faruk shaikh) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे केली. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी याबाबत सकारात्मक विचार करुन निधी उपलब्ध करुन देण्याचे अभिवचन दिल्याचे आमदार शाह यांनी म्हटले आहे. (MLA Shah deemands funds from CM Eknath Shinde for Dhule city)

MLA Farukh Shaikh
वाघ, वाघीण अन् आता वाघोबाही गेले, उरले केवळ मावळे…

यापूर्वी शासनाने धुळे शहरातील देवपूर भागासाठी अमृत योजनेंतर्गत भूमिगत गटार योजना मंजूर केली आहे. या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे पूर्णत्वास आली आहेत. मात्र मागील ठेकेदाराने देवपूर भागात भूमिगत पाइपलाइन टाकताना रस्ते खोदले, त्यानंतर या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे देवपूर भागातील नागरिकांनी महानगरपालिकेविरुद्ध आंदोलने केली होती. या रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे धुळेकर नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. या सर्व बाबींचा विचार करून व धुळेकर नागरिकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेऊन महानगरपालिकेने नवीन प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना आपण महानगरपालिकेचा अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.

MLA Farukh Shaikh
धुळे शहरात महापौर प्रदीप कर्पे ‘रिटर्न्स’

त्याअनुषंगाने कामांसाठी २५० कोटी रुपयांची आवश्यकता होती. हा निधी तातडीने धुळे महानगरपालिकेला मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न करत होतो.

दरम्यान, नवनिर्वाचित मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची मंत्रालयात भेट घेऊन धुळे शहराची ही समस्या मांडली. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी याबाबत तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना धुळे महानगरपालिका क्षेत्रासाठी अमृत योजनेचा दुसरा टप्पा मंजूर करून २५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा असे आदेशित केल्याचे आमदार श्री. शाह यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com