Maharashtra Assembly Result 2024 : महाविकास आघाडीचा धुव्वा, महायुती सर्व जागांवर आघाडी!

Mahavikas Aghadi trails as Mahayuti leads across Maharashtra: विधानसभा निवडणुकीचे मतमोजणी सुरू असून महायुतीचे सर्व उमेदवार आघाडीवर आहेत.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Result of Maharashtra Election 2024: नाशिक जिल्ह्यात १५ पैकी १४ जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. सर्व विद्यमान आमदार विजयाच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. महाविकास आघाडी मोठ्या फरकाने पिछाडीवर आहेत त्यामुळे महायुतीत जल्लोष आहे.

सध्या सुरू असलेल्या मतमोजणीतील कल असा, येवला मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे मंत्री छगन भुजबळ तिसऱ्या फेरी अखेर ८६ मतांनी आघाडीवर आहेत. या मतदारसंघाकडे सबंध राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. सुरुवातीच्या दोन फेऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव शिंदे यांनी अल्प आघाडी घेतली होती.

Ajit Pawar
Chandrashekhar Bawankule : 'एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली...'; निकालापूर्वीच बावनकुळेंचा कार्यकर्त्यांना भावनिक मेसेज

बहुचर्चित नांदगाव मतदार संघात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांनी मोठी आघाडी घेतली असून सध्या ते चौदा हजार मतांनी पुढे आहेत. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात अनपेक्षित रित्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुधाकर बडगुजर तिसऱ्या स्थानावर गेले. भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरे पाच हजार ६६० मतांनी आघाडीवर आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिनकर पाटील दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

Ajit Pawar
Kothrud Election Result 2024 : महायुतीला 160 जागा मिळणार पण मुख्यमंत्री..., मतमोजणीला सुरूवात होताच चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य

नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपच्या आमदार देवयानी फरांदे चार हजार ६६ मतांनी आघाडीवर आहेत. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार राहुल ढिकले चार हजार मतांनी आघाडीवर आघाडीवर आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या जिल्ह्यातील सर्व सात जागांवरील उमेदवार आघाडीवर आहेत. यामध्ये सर्व सहा विद्यमान आमदार पुढे आहेत. देवळाली विधानसभा मतदारसंघात सरोज अहिरे बारा हजार मतांनी आघाडीवर आहेत.

एमआयएम पक्षाचे मौलाना मुक्ती हे जिल्ह्यातील एकमेव आमदार होते. त्यांचा पराभव होताना दिसतो आहे. या ठिकाणी अपक्ष असिफ शेख आघाडीवर आहे. मालेगाव बाह्य मतदारसंघात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे विद्यमान पालकमंत्री दादा भुसे यांनी मोठी आघाडी घेतली आहे. शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांचा धक्कादायक पराभव होताना दिसतो. मंत्री भुसे सतरा हजार ४०० मतांनी आघाडीवर आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर तान हजार ६०० मतांनी आघाडीवर आहेत. दिंडोरीतून नरहरी झिरवाड चार हजार ४५६ मतांनी आघाडीवर आहे. तर निफाड येथून याच पक्षाचे विद्यमान आमदार दिलीप बनकर आठ हजार १९९ आघाडीवर आहेत.

मालेगाव मध्य मधून अपक्ष असिफ शेख तान हजार ६३७ मतांनी आघाडीवर आहेत. बागलान मतदार संघातून भाजपचे दिलीप बोरसे दहा हजार ६६० आघाडीवर आहेत, तर कळवण मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार नितीन पवार ६५५ मतांनी आघाडीवर आहेत. सिन्नर मधून माणिकराव कोकाटे तेरा हजार ९०० मतांनी आघाडीवर आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com