Jalgaon : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बीडमध्ये गुरूवारी जाहीर सभा झाली. या सभेत पवारांनी अजित पवार गटासह धनंजय मुंडेंवरही निशाणा साधला. येवला, बीडनंतर आता पवारांची स्वाभिमान सभा कुणाच्या मतदारसंघात होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते. आता शरद पवार यांच्या स्वाभिमान सभा आता संपूर्ण महाराष्ट्रात होणार असल्याचे दिसून येत आहे. येत्या ४ सप्टेंबर रोजी पवार यांची जळगावात सभा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार(Sharad Pawar) पुढच्या महिन्यात जळगाव दौऱ्यावर येत आहेत. ४ सप्टेंबरला सागर पार्क येथे त्यांची जाहीर सभा होणार असल्याची माहिती आमदार एकनाथ खडसे यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना दिली. बुधवारी जळगाव येथील त्यांच्या निवासस्थानी नियोजनाबाबत बैठक झाली. येवला, बीडमधील सभांना मिळालेला प्रचंड पाहून शरद पवार गटाचा उत्साह चांगलाच दुणावला आहे. त्यातूनच पवारांनी आपल्या पुढील स्वाभिमान सभा जाहीर केल्या आहेत.
जळगाव येथील मुक्ताई निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची प्राथमिक बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचा ४ सप्टेंबरला जळगाव जिल्ह्यात दौरा आहे. या दौऱ्याच्या नियोजनाची चर्चा बैठकीत झाली. सागर पार्क येथे सभा घेण्याचे नियोजन आहे. नियोजनासाठी जळगाव जिल्हा व महानगर जळगाव यांची संयुक्त बैठक मंगळवारी (ता. २२) होणारी आहे.
अजित पवारांसोबत गेलेल्या दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) च्या मतदारसंघानंतर शरद पवार हे कोल्हापुरात सभा घेणार आहेत. कोल्हापूर आणि शरद पवार हे वेगळे नाते आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर कोल्हापूरने पवारांना कायम साथ दिली आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर मात्र हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील या दोन्ही आमदारांनी पवारांची साथ सोडली आहे. त्यामुळे पवार आता कोल्हापूरच्या मैदानात उतरणार आहेत. हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) पवारांना सोडून जातील, असे कोणालाही वाटत नव्हतं.
बैठकीला जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्रभैय्या पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, महानगर महिला जिल्हाध्यक्षा मंगला पाटील, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, आदिवासी विभाग जिल्हाध्यक्ष इब्राहिम तडवी, समाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अशोक सोनवणे, जामनेर तालुकाध्यक्ष विलास राजपूत, महानगर शहर संघटक राजू मोरे, महानगर जिल्हा उपाध्यक्ष किरण राजपूत, मार्केट कमिटी संचालक डॉ. अरुण पाटील, समाजिक न्याय उपाध्यक्ष रमेश बारे, संदीप हिवाळे, सौरभ औचाडे, शुभम म्हस्के, राहुल टोके आदी उपस्थित होते.
(Edited By Deepak Kulkarni)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.