

Ajit Pawar party MLA news : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शिलेदार आमदार संग्राम जगताप दुखवट्यातून सावरले असून, पुन्हा हिंदुत्वाचा हुंकार भरण्याची तयारी सुरू केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका ही माझी जबाबदारी आहे, तर हिंदुत्व हे माझे कर्तव्य आहे. त्यामुळ जबाबदारी आणि भूमिका दोन्ही पार पडेल, असे सांगून पुन्हा हिंदुत्वाचा हुंकार भरण्याची तयारीत असल्याचे संकेत दिले.
अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयातील अत्याधुनिक कार्डियाक कॅथलॅब युनिटचे लोकार्पण भाजपचे (BJP) माजी खासदार सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थित झाले. आमदार जगताप यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावर भूमिका मांडली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा छत्रपती शिवाजी महाराज-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारधारेवर कार्य करतो. सर्वसमावेशक अशी भूमिका असताना, हिंदु्त्वाची वेगळी भूमिका स्वीकारल्यावरून अजित पवार (Ajit Pawar) यांनी आमदार जगताप यांना काय सल्ला दिला, याकडे लक्ष वेधल्यावर आमदार जगताप यांनी भूमिका मांडली.
'पक्षाच्या भूमिकेसंदर्भात मतदारसंघातील मतदारांनीा माझ्यावर जबाबदारी दिली, निवडून दिले. ते मी पार पाडत आहे. परंतु हिंदुत्व माझे कर्तव्या आहे. तेही मी पार पाडतो आहे. मतदारांनी टाकलेली जबाबदारी आणि मी स्वीकारलेले कर्तव्य दोन्ही मला पार पाडायचे आहे,' असे आमदार जगताप यांनी म्हटले.
संग्राम जगताप यांनी मतदार यादीतील घोळावर देखील प्रतिक्रिया दिली. अहिल्यानगर शहर मतदारसंघातील यादीत अनेक बांगलादेशींची नावे आहेत. अनेक बांगलादेशी अहिल्यानगमध्ये आढळले आहेत. त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहेत, अटकही झाली आहेत. परंतु मुळाशी जावून पोलिसांनी तपास केलेला नाही, असे आरोप केला.
अहिल्यानगर शहरातील बांगलादेशींचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे. लोकसभा निवडणुकीवेळी जी मतदार यादी होती, तिच विधानसभा निवडणुकीवेळी होती. परंतु पराभूत झाले की, मतदार यादीत घोळ आणि मतदान यंत्रात दोष, अशी ओरड केली जाते, असा चिमटा देखील संग्राम जगताप यांनी विरोधकांना काढला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.