Ajit Pawar News : अजित पवारांची महाविकास आघाडी सरकार पाडण्यात मदत; गिरीश महाजनांचा खळबळजनक दावा

Girish Mahajan on MVA Government : ठाकरेंकडे सकाळच्या भोंग्याशिवाय कुणीही राहणार नाही
Girish Mahajan, Ajit Pawar
Girish Mahajan, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Girish Mahajan And Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याभोवती सुरू असलेल्या चर्चा काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. त्यातच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी अजितदादांबाबत एक वक्तव्य केले आहे. महाविकास आघाडी सरकारबाबत महाजनांनी नाशिक येथे वक्तव्य केले. त्यामुळे राज्यात पुन्हा नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Latest Marathi News)

मंत्री गिरीश महाजन यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकार कोसळण्याबाबत मोठे विधान केले आहे. महाजन म्हणाले की, "तत्कालीन महाविकास आघाडी सरकार पाडण्यात अजित पवार अर्थमंत्री असताना मोठी मदत झाली होती." महाजनांच्या या खळबळजनक वक्तव्याने राज्याच्या राजकारणात आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. दरम्यान, अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा मध्यंतरी समोर आल्या होत्या. मात्र पवार यांच्या भोवती सतत संशयाचे वातावरण निर्माण केले जात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसनेही सांगितले आहे.

Girish Mahajan, Ajit Pawar
Thackery And Shinde Group : वर्धापन दिनादिवशीच ठाकरे गटाने शिंदे गटाला डिवचलं; म्हणाले, "प्रतिमंडळ..."

सत्तासंघर्षाच्या निकालानंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चेला जोर धरला आहे. मात्र सध्यातरी त्यावर काही हलचाली सुरू नसल्याची टीका विरोधकांनी केली आहे. यावरही महाजन यांनी यावेळी माहिती दिली. ते म्हणाले, "मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला जाऊन आले आहेत. त्यामुळे आता मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल. सध्या खाते आणि नावानुसार चर्चा सुरू आहे."

Girish Mahajan, Ajit Pawar
Mumbra Conversion Case : राष्ट्रवादीनं मुख्यमंत्र्यांना पाठवली कायदेशीर नोटीस ; ..अन्यथा माफी मागा

गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. महाजन म्हणाले, "आता मनिषा कायंदे शिंदेंनी गटात प्रवेश केला. ठाकरे गटाला रोजच धक्के बसत आहेत. आणि पुढेही बसणार आहेत. त्यांच्याकडे सकाळच्या भोंग्याशिवाय दुसरे कुणीही राहणार नाही." प्रकाश आंबेडकरांबाबत ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहनही महाजनांनी यावेळी केले. ते म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. याचे कोणीही समर्थन करणार नाही. उद्धव ठाकरेंचे याला समर्थन आहे का? त्यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com