सर्वधर्मीय स्थळे खुले; राष्ट्रवादीने बाजी मारली, भाजप फक्त बघत राहिली !

मंदिरे खुली व्हावीत म्हणून आंदोलनाचे रण भारतीय जनता पक्षाने उठवले होते.
Chhagan Bhujbal, Nitin Pawar at Wani temple
Chhagan Bhujbal, Nitin Pawar at Wani templeSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : मंदिरे खुली व्हावीत म्हणून आंदोलनाचे रण भारतीय जनता पक्षाने उठवले होते. (Bjp made agitation for opening of temples) पण नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेला सर्वधर्मीयांची स्थळे खुली करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. (But Maha vikas Aghadi leaders took the milage of open templesहा निर्णय ‘कॅश' करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मैदानात उतरला. पालकमंत्री छगन भुजबळ, (Chhagan Bhujbal) विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांच्यापासून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर-जिल्ह्यातील विविध आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले

Narhari Zirwal at Trimbakeshwar temple
Narhari Zirwal at Trimbakeshwar templeSarkarnama
Chhagan Bhujbal, Nitin Pawar at Wani temple
नरहरी झिरवाळांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी खुले

काल पालकमंत्री छगन भुजबळ कुटुंबियांनी जिल्ह्यातील सर्व प्रमुख धार्मिकस्थळ व तीर्थक्षेत्रांना भेट दिली. मंदिरे, गुरुद्वार, चर्च आणि नाशिकची ख्यातनाम बडी दर्गा असा समतोल त्यांनी साधला. विधानसभेचे प्रभारी सभापती नरहरी झिरवाळ यांनी वारकऱ्यांचे महत्त्वाचे स्थान असलेले संत निवृत्तीनाथ समाधी तसेच आद्य ज्योर्तिलींग त्र्यंबकेश्वरला दर्सन घेऊन ते भाविकांसाठी खुले केले. सर्वांना बरोबर घेतल्याचा संदेश त्यातून दिला. मात्र भाजप अक्षरशः निद्रीस्त होते. त्यांनी ही संधी गमावली.

Chhagan Bhujbal, Nitin Pawar at Wani temple
आमदार सरोज अहिरे अजितदादांशीही खोटे बोलल्या, त्यांना शिवसेनेचा झटका दाखवू!

शहरातील ऐतिहासिक काळामंदिर खुले करण्याच्या सोहळ्यासाठी महापौर सतीश कुलकर्णी आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे भाजपचे प्रदेश संघटन चिटणीस श्रीकांत भारतीय हे नाशिकमध्ये असताना पक्षाच्या शहर पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. शिवसेनेतर्फे काळाराम मंदिर, देवळाली गावातील गणपती मंदिरात महाआरती करण्यात आली. अशा परिस्थितीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने शहर-जिल्ह्यातील सर्वधर्मीयांच्या प्रार्थना स्थळांना भेटी देत दर्शन घेतले. त्यामुळे नवरात्रोत्सवातील पहिल्या माळेचा राष्ट्रवादीचा उपक्रम ठळकपणे पुढे आल्याचे चित्र आगामी महापालिका, पालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या तोंडावर बघावयास मिळाले. सर्वधर्मीय धार्मिक स्थळांना भेटी देऊन श्री. भुजबळ यांनी कोरोनामुक्तीसाठी प्रार्थना केली. भक्तीमंदिरे खुली करण्याच्या राज्य सरकारचा निर्णय श्री. भुजबळ यांनी अधोरेखित करत कोरोना वाढणार नाही याची काळजी घेण्याची विनंती पहिल्याच दिवशी उसळलेल्या गर्दीमुळे भक्तांना केली आहे.

श्री. भुजबळ यांनी सकाळी सप्तशंगीदेवी गडावर जाऊन खानदेशचे कुलदैवत सप्तशंगीदेवीचे दर्शन घेतले. त्यांच्यासमवेत कळवण-सुरगाणाचे आमदार नितीन पवार होते. त्यानंतर सायंकाळी नाशिकचे ग्रामदैवत कालिकादेवी मंदिरात श्री. भुजबळ यांनी महाआरती केली. शिंगाडा तलाव येथे गुरुद्वारा आणि जुन्या नाशिकमधील बडी दर्गाला भेट देत चादर चढवली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, डॉ. शेफाली भुजबळ, कालिका देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष केशवराव पाटील, नगरसेवक समीना मेमन, सुफी जीन, गुरमीत बग्गा, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, शहराध्यक्षा अनिता भामरे, अंबादास खैरे, समाधान जेजुरकर, दत्ता पाटील, महेश भामरे, शंकर मोकळ, परमीत बग्गा, संजय खैरनार, दिनेश कमोद आदी उपस्थित होते.

काँग्रेस-राष्ट्रवादीतर्फे आरती

श्री. झिरवाळ आणि इगतपुरी- त्र्यंबकेश्‍वरचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर, श्री. ठाकरे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग आदींच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्‍वरचे श्री ज्योतिर्लिंग आणि संत निवृत्तीनाथ महाराज मंदिरात पूजा-आरती करण्यात आली. तसेच ब्रह्मगिरी गंगाद्वार येथे पर्यटकांपेक्षा भाविकांची संख्या अधिक असते. हे लक्षात घेऊन पर्यटन विभागाकडून आकारण्यात येणारा शुल्क वगळण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही श्री. झिरवाळ यांनी दिली. चांदवड येथील रेणुकादेवी मंदिरात ॲड पगार यांनी पूजा केली. चंदनपुरीच्या खंडोबा मंदिरात पूजेसाठी राजेंद्र भोसले उपस्थित होते. नस्तनपूरच्या शनिमंदिरात माजी आमदार पंकज भुजबळ यांनी पूजा केली. सौ. भुजबळ, सौ. बलकवडे आदी उपनगरच्या सेंट झेव्हअर्स चर्चमध्ये प्रार्थनेला उपस्थित राहिले. ओढा येथील सिद्धिविनायक मंदिरात जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड आणि सौ. बलकवडे यांनी स्थानिकांच्या उपस्थितीत आरती केली. यावेळी विष्णुपंत म्हैसधुणे, राजाराम धनवटे, जिल्हा परिषद सदस्य यशवंत ढिकले, बाळासाहेब म्हसके, पंचायत समिती सदस्य विजया कांडेकर, प्रवीण वाघ, सरपंच विष्णू पेखळे, शीतल भोर, अनिता रिकामे, सायरा शेख, पुष्पलता उदावंत, साहेबराव पेखळे, विलास कांडेकर, शरद गायधनी आदी उपस्थित होते. सौ. डॉ. भुजबळ यांनी काळाराम मंदिरात अभिषेक व पूजन करत दर्शन घेतले. त्याचबरोबर त्यांनी पंचवटीतील गंगाघाट येथील सप्तश्रृंगी मातेच्या मंदिरातही आरती केली.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com