Yeola APMC News: येवल्याच्या भल्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करा!

Yeola Bazar Samiti: छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत बाजार समितीतील विजयी शेतकरी विकास पॅनलचा विजयोत्सव
Bhujbal with APMC winners
Bhujbal with APMC winnersSarkarnama

APMC Yeola News: येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी विकास पॅनलला मिळालेले यश हे निवडणुकीत रात्रंदिवस काम केलेल्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे यश असून, हा विजय मी त्यांना समर्पित करतो. येवल्याच्या विकासासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपली ही एकजूट कायम ठेऊन एकदिलाने सामोरे जावे. असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. (Chhagan Bhujbal given credit to followers for APMC victory)

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत (APMC) भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलने यश मिळविले. या निकालानंतर ते प्रथमच येवला दौऱ्यावर आले होते. यावेळी ढोलताशाच्या गजरात, जेसीबीद्वारे फुलांची उधळण व फटाक्यांची आतशबाजी करत जल्लोषात स्वागत करण्यात आले.

Bhujbal with APMC winners
Owaisi News : `लव्ह जिहाद` विषयी बोलता, बेपत्ता महिला संदर्भात गप्प का?

त्यावेळी ते बोलत होते. श्री. भुजबळ म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आपल्याला सामोरे जायचे आहे. त्यासाठी महाविकास आघाडीतील सदस्यांच्या मनामध्ये किंतू-परंतु नसावे. आगामी निवडणुकांना एकदिलाने सामोरे जावे. तालुक्याचे राजकारण करायचे असेल, तर ते एकदिलाने व्हायला हवे. सर्वांनी एकजुटीने निवडणूक लढविल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.

सर्व उमेदवारांना निवडून आणण्याची आपली जबाबदारी होती. मात्र, आपले तीन उमेदवार पराभूत का झाले, याचादेखील विचार करण्याची गरज आहे. आता निवडणूक संपली असून, निवडणुकीतील राजकारण बाजूला ठेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करण्यास प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी या वेळी नमुद केले. तसेच, तालुक्यातील नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी, त्यांच्या हितासाठी सर्वांनी एकत्रित राहून काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Bhujbal with APMC winners
Chhagan Bhujbal news : शिंदे गटाच्या आमदारांवर लक्ष का नाही ठेवले?.

माजी आमदार मारोतीराव पवार, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, शिवसेना नेते संभाजी पवार, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, शेतकरी संघटनेचे नेते संतू पाटील झांबरे, राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, राधाकिसन सोनवणे, ज्येष्ठ नेते विश्‍वास आहेर, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, शहराध्यक्ष दीपक लोणारी, कार्याध्यक्ष ज्ञानेश्‍वर शेवाळे आदी यावेळी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com