राज ठाकरेंची हनुमान चालीसा तर अमित ठाकरेंची महाआरती!

त्र्यंबकेश्‍वर येथे मंगळवारी अभिषेक करताना मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे.
MNS leader Amit Thackeray performs Abhishek, Amit Thackeray Latest Marathi News
MNS leader Amit Thackeray performs Abhishek, Amit Thackeray Latest Marathi News Sarkarnama
Published on
Updated on

त्र्यंबकेश्‍वर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नेते राज ठाकरे (Raj Thakre) सध्या हनुमान चालीसा प्रकरणामुळे चर्चेत आहे. राज्यभर यावर राजकीय तणाव आहे. अशातच मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thakre) यांनी मंगळवारी त्र्यंबकेश्वर नगरीला (Trimbakeshwar) भेट दिली. त्यांनी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेत अभिषेक व महाआरती केली. यावेळी त्यांनी अन्य राजकीय कार्यक्रम टाळले. (Amit Thackeray Latest Marathi News)

MNS leader Amit Thackeray performs Abhishek, Amit Thackeray Latest Marathi News
मी मंजूर केलेली कामे देखील भाजपला करता आली नाही!

मनसेतर्फे अमित ठाकरे यांच्यावर नाशिक महापालिका निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे वरचेवर त्यांचे नाशिकला दौरे होत आहेत. मात्र पक्षाला अद्यापही महापालिका निवडणुकीसाठी सुर गवसलेला नाही. अन्य राजकीय पक्ष आणि विशेषतः शिवसेना जोमाने तयारी करीत सत्तेत येण्यासाठी आत्मविश्वासाने काम करीत आहे. भारतीय जनता पक्षाकडून देखील विविध स्तरावर राजकीय उपक्रम केले जात आहेत. अशा स्थितीत मनसेला कोणत्या राजकीय दिशेने जावे हे उमगलेले नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे हनुमान चालीसा पठणाच्या विषयाने सुरु असलेल्या चर्चेत अमित ठाकरेंना त्र्यंबेकश्वर प्रसन्न होईल का याची उत्सुकता आहे.

MNS leader Amit Thackeray performs Abhishek, Amit Thackeray Latest Marathi News
हिंदू मित्राच्या मुलीचे मुस्लिम दांपत्याकडून कन्यादान!

यावेळी ठाकरे परिवाराचे उपाख्य नीरज शिखरे गुरुजी यांनी पौरोहित्य केले. देवस्थान ट्रस्टच्या वतीने अमित ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. पुरोहित संघातर्फे कार्याध्यक्ष मनोज थेटे यांनी ही सत्कार केला.

यावेळी पक्षाचे सरचिटणीस अशोक मुर्तडक, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, ॲड. रतनकुमार ईचम, शहराध्यक्ष दिलीप दातीर, समन्वयक सचिन भोसले यांच्यासह सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व त्र्यंबक नगरीतील बाळासाहेब सावंत, तालुकाध्यक्ष नवनाथ नाना कोठुळे, भूषण भुतडा, मोहन सूर्यवंशी, सुयोग नार्वेकर, दिपेश सावंत, संदीप शिंदे, ललित मुळाणे, सुयोग देवकुटे, अनिल चोथे, योगेश कोठुळे, दीपक कसबे, सचिन कोठुळे, अजिंक्य देवरे, निखिल शिखरे यांच्यासह बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com