Mahayuti Political News : महायुतीत खटक्यावर खटके; भाजपच्या 'या' मंत्र्यांवर अजित पवार गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप

Amol Mitkari complaint about Minister Radhakrishna Vikhe : मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासह भाजपचे काही मंत्री वेळ देत नसल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. अमोल मिटकरी यांच्या तक्रारीवरून महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.
Eknath Shinde - Devendra Fadnavis - Ajit Pawar
Eknath Shinde - Devendra Fadnavis - Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महायुतीमध्ये सर्व काही अलबेल असल्याचे सांगितले जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतील, तसेच मंत्री, नेते आणि कार्यकर्ते कार्यवाही करतात.

परंतु तसे काही नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांना थेट आव्हान दिले आहे. यामुळे महायुतीमधील धुसफूस पुन्हा बाहेर पडली आहे. भाजपचे मंत्री कामासाठी वेळच देत नाही, असा गंभीर आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे.

भाजप (BJP) नेते तथा राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे अकोल्याचे पालकमंत्री आहेत. परंतु ते अकोल्याला वेळ देत नाही आणि कामानिमित्ताने संपर्क केल्यास फोन उचलत नाही, अशी आमदार अमोल मिटकरी यांनी तक्रार केली आहे. राधाकृष्ण विखे यांच्यासह त्यांचा कोणताच ओएसडी आणि स्वीय साहयक फोन घेतल्याचे देखील तक्रारीत म्हटले आहे. मंत्री विखे हे 'ऑनलाईन पालकमंत्री' झालेत, अशी खोचक टिका अमोल मिटकरी यांनी केली.

Eknath Shinde - Devendra Fadnavis - Ajit Pawar
Gokul Zirwal : छाती फाडली, तर शरद पवार दिसतील, वडिलांविरोधात विधानसभेसाठी शड्डू; नरहरी झिरवाळांच्या पुत्राचं 'शरद पवार प्रेम'!

लोकसभा निवडणुकांपासून राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) अकोल्याकडे फिरकले नाहीत. जिल्हा नियोजन समितीची बैठक उद्या होत आहे. या बैठकीला मंत्री विखे ऑनलाईन उपस्थित राहणार असल्याचे समजते. राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. अकोल्यात पूरस्थिती उद्भवली आहे. यावर चर्चा करण्यासाठी फोन केला होता. त्याचा वेगळाच अनुभव आल्याचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले. मंत्री विखे यांना अकोल्याला वेळ देता येत नसेल, तर भाजप आमदार रणधीर सावरकर यांना पालकमंत्रीपद द्या, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली.

Eknath Shinde - Devendra Fadnavis - Ajit Pawar
Nilesh Lanke : 'भ्रष्टाचाराचे मडके', खासदार लंकेंचे उपोषण; 'LCB'च्या कारभाराचे धिंडवडे

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अमोल मिटकरी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याबरोबर असलेल्या अनुभवावरून भाजपच्या मंत्र्यांशी जंत्रीच मांडली. विखे पाटील यांच्यापाठोपाठ गिरीष महाजन, रवींद्र चव्हाण, सुरेश खाडे या मंत्र्यांसंदर्भात देखील असाच अनुभव येत असल्याची तक्रार अमोल मिटकरी यांनी केली आहे. मंत्री विखे यांच्या कार्यपद्धतीची तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार असल्याचे अमोल मिटकरी यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com