गिरीश महाजनांच्या लेकीच्या लग्नात चर्चा फक्त अमृता फडणवीसांची!

गिरीष महाजन यांच्या मुलीच्या लग्नाला भाजपसह विविध पक्षांच्या मंत्री व नेत्यांनी हजेरी लावली,
Amruta Fadanvis News
Amruta Fadanvis NewsSarkarnama
Published on
Updated on

जळगाव : भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते व माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची कन्या श्रेया हिचा विवाह सोहळा रविवारी थाटात संपन्न झाला. या सोहळ्याला केंद्रातील विविध मंत्र्यांसह अनेक नेत्यांची मांदीयाळी होती. मात्र त्यात चर्चेचा विषय ठरल्या अमृता फडणवीस. (Amruta Fadanvis) भाजप कार्यकर्त्यांपासून तर उपस्थितांनीही त्यांच्या समवेत फोटो व सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. (Amruta Fadanvis News)

Amruta Fadanvis News
कांदा निर्यातीला चालना देण्याचे शरद पवारांना साकडे

गिरीश महाजन व जामनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांची व्दितीय कन्या श्रेया हिचा विवाह पुणे येथील अजय व सौ. राजश्री गुजर यांचे सुपुत्र अक्षय यांच्याशी संपन्न झाला. केंद्रीय तसेच राज्यातील मंत्री तसेच विविध राजकीय नेत्यांनी या सोहळ्याला हजेरी लावली. यासह मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.

Amruta Fadanvis News
भुजबळांची भरणेंना साद, तुमचा आमचा एक आवाज!

विवाह सोहळ्यासाठी जामनेर येथील हिवरखेडा रस्त्यावर सहा एकर परिसरात भव्य मंडप उभारण्यात आला होता. तर आकर्षक प्रवेशव्दार करण्यात आले होते. तसेच त्यांच्या निवासस्थानीही भव्य मंडप उभारण्यात आला होता. निवासस्थानी सकाळी विवाहाचे वैदिक पार पडले.

निवासस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नारायण राणे, रावसाहेब दानवे, राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, ॲड. रोहिणी खडसे, माजी आमदार स्मिता वाघ, आमदार जयकुमार रावल यांनी भेट दिली व वधू-वरांना आर्शिवाद दिले. तर सायंकाळी गोरज मुहूर्तावर विवाह पार पडला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार छत्रपती संभाजी राजे, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार उन्मेश पाटील तसेच जिल्ह्यातील राजकीय नेते उपस्थित होते.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com