Amruta Pawar Vs Chhagan Bhujbal : 'असे लाख गुन्हे दाखल झाले तरी..' ; अमृता पवारांचा भुजबळांना इशारा?

Yewla Constituency Political News : ...या प्रकरणी भाजपाच्या अमृता पवार यांच्यासह तीन महिलांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
Amruta Pawar
Amruta PawarSarkarnama

BJP Vs Bhujbal Politics : पालखेड धरणाच्या पाण्यावरून जानेवारी महिन्यात सुरू झालेले येवला मतदारसंघातील राजकारण थांबण्याची चिन्हे नाहीत. या संदर्भात भाजपाच्या अमृता पवार यांच्यासह तीन महिलांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे शेतकरी संतप्त आहेत.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांच्या येवला मतदार संघात पालखेड धरणाचे आवर्तन जानेवारी महिन्यात सोडण्यात आले होते. त्यात काही गावांना जाणीवपूर्वक पाणी न दिल्याचा आरोप करत पाटबंधारे विभागाच्या विरोधात शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन केले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Amruta Pawar
Jalgaon Loksabha Constituency : ए.टी. पाटलांनी जळगाव लोकसभेसाठी पुन्हा ठोकला शड्डू!

यावेळी शिरसगाव सहकारी गावांनी पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून पाटबंधारे विभागाला पाण्याची मागणी नोंदविली होती. त्यासाठीचे पैसे देखील जमा केले होते. मात्र तरीही या भागाला पाणी मिळत नव्हते. त्यामुळे येथील महिला आणि शेतकऱ्यांनी भाजपाच्या अमृता पवार यांच्यासह चारी क्रमांक 26 येथील गेट तोडून गावाला पाणी दिले होते. त्यावरून राजकारण चांगलेच तापले होते.

याबाबत, शुक्रवारी येवला ग्रामीण पोलीस ठाण्यात भाजपा(BJP) नेत्या अमृता पवार, हिराबाई कैलास गावडे आणि यमुनाबाई भाऊसाहेब चव्हाण यांच्यासह शेतकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यासंदर्भात शनिवारी दुपारी परिसरातील शेतकरी महिला आणि भाजपाचे कार्यकर्ते पोलिस ठाण्यात गेले होते. यावेळी पोलिस ठाण्यात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. पोलिसांनी संबंधितांना गुन्हा दाखल झाल्याची लिखित प्रत देऊन न्यायालयात जाण्यास सांगितले. मात्र गुन्हा दाखल झाल्याने शेतकरी वर्ग चांगलाच संतप्त झाला होता.

Amruta Pawar
Maratha Reservation : व्याप्ती वाढली; मराठा आंदोलकांनी मुंबई महामार्ग केला ठप्प!

कोणता राजकीय नेता दबाव आणत असावा, हे सर्वश्रुत -

यावेळी अमृता पवार म्हणाल्या, 'यासंदर्भात गेले महिनाभर पाटबंधारे विभागावर राजकीय दबाव होता अधिकारी प्रचंड दडपणाखाली होते. या दडपणातूनच त्यांनी काल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार एक महिन्यापूर्वी घडला मात्र काल गुन्हे दाखल करण्यात आले. यावरून यामागे असलेले राजकीय षडयंत्र स्पष्ट होते. यात कोणता राजकीय नेता दबाव आणत असावा, हे सर्वश्रुत आहे. मात्र असे लाख गुन्हे दाखल झाले तरीही, शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि पाण्यासाठी कितीही झगडावे लागले तरीही मी झगडतच राहील.'

एकंदरच मंत्री भुजबळ यांच्या विधानसभा मतदारसंघात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या विषयांवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्यात पालखेड बंधाऱ्याच्या पाण्याच्या रोटेशन वरून भाजप विरुद्ध भुजबळ असे चित्र निर्माण झाले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com