Anil Patil: पवारांच्या विधानानं माझी झोपच उडाली! "बरं झालं अजितदादांनी निर्णय घेतला, आमच्या हातून ते पाप घडलं नाही...

Maharashtra Politics: "संजय राऊत यांना पवारांनी हाताशी धरून शिवसेना ठाकरे गटाला आपल्या मुठीतमध्ये धरून ठेवले आहे. ठाकरे गटाला सोबत घेऊन काँग्रेसमध्ये विलीन करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
Anil Patil news
Anil Patil newsSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News: गेल्या काही वर्षात विविध राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांचं भविष्य धोक्यात आल्याची चर्चा सुरू असताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी 2024 च्या निवडणुकीनंतर विरोधी पक्षांच्या राजकारणासाठी प्रादेशिक पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल," असे विधान केले आहे. भाजपकडून प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा आरोप अनेक नेत्यांकडून केला जात असताना प्रादेशिक पक्षांच्या वाढीसाठी शरद पवारांचं वक्तव्य महत्त्वपूर्ण ठरत आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, अमळनेर विधानसभेचे आमदार, मंत्री अनिल पाटील यांनी पवारांच्या या विधानामुळे आपली झोपच उडाली, असा टोमणा लगावला. "बरे झाले आम्ही अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतले आणि आम्हाला काँग्रेसमध्ये जाण्यापासून अलिप्त ठेवलं. काँग्रेसमध्ये जाण्याचे पाप आमच्या हातून घडलं नाही, असा टोला अनिल पाटलांनी लगावला.

Anil Patil news
Locate Your Polling Station: मतदान केंद्राचे नाव निवडा, आपले मतदान केंद्र शोधा!

ठाकरे गटातील नेते, खासदार संजय राऊत यांनी पवारांनी हाताशी धरून शिवसेना ठाकरे गटाला आपल्या मुठीतमध्ये धरून ठेवले आहे. त्या शिवसेनेला सोबत घेऊन काँग्रेसमध्ये विलीन करण्याचे संकेत त्यांनी दिले आहे, असे अनिल पाटलांनी माध्यमांना सांगितले.

नुकत्याच झालेल्या बारामती लोकसभा निवडणुकीबाबत अनिल पाटील म्हणाले,"बारामती मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानाची टक्केवारी चांगली आहे. पुण्याच्या जवळीत भागात टक्केवारी घटली आहे. बारामतीकरांना माहिती आहे की पंचवीस वर्षांसाठी अजित पवारांसोबत विकासाची गंगा आपल्याला सुरू ठेवायची आहे. अजित दादांवर त्यांचा विश्वास आहे, त्यामुळे सुनेत्रा पवार निवडून येतील,"

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे या अजितदादांच्या घरी गेल्या होत्या, त्यावर अनिल पाटील म्हणाले, "राजकारणापलीकडे नातेसंबंध असतातत. ती संस्कृती आहे. पण मतदार राजा हुशार आहे असं कोणी कोणाच्या भेटीला गेलं तर मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होईल अशी परिस्थिती आता राहिलेली नाही,"

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com