Anna Hazare RTI Protest : ‘अधिकारीच मालक बनलेत!’; माहिती अधिकार कायद्यातील बदलांवर अण्णा हजारे संतप्त, सरकारला दिला मोठा इशारा

Anna Hazare reaction on RTI Act changes: अण्णा हजारे यांनी माहिती अधिकार कायद्यातील दुरुस्त्यांविरोधात पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत सरकारला थेट इशारा दिला आहे.
Anna Hazare warns government over RTI changes
Anna Hazare warns government over RTI changesSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra RTI Law Changes: अण्णा हजारे यांनी माहिती अधिकार (RTI) कायद्यातील दुरुस्त्यांविरोधात पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत सरकारला थेट इशारा दिला आहे.

या दुरुस्त्यांविरोधात 5 जुलैपासून बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा देत हजारे यांनी राज्य सरकारवर दबाव वाढवला होता. मात्र त्यानंतर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी दूरध्वनीवरून चर्चा केल्यानंतर परिस्थितीत काहीसा बदल झाला आहे.

यासंदर्भात बुधवारी (24 जून) राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे (Anna Hazare) आणि राहुल पांडे यांच्यात पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण बैठक होणार असून, याच बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा निश्चित होणार आहे. प्राथमिक चर्चेनंतर हजारे यांनी नियोजित आंदोलन सध्या स्थगित ठेवले असले तरी सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.

माहिती अधिकार कायद्यात करण्यात आलेल्या दुरुस्त्यांवर संताप व्यक्त करताना अण्णा हजारे म्हणाले, या देशात जनता मालक आहे आणि अधिकारी हे सेवक आहेत. पण आता अधिकारीच मालक झाल्यासारखे वागत आहेत. त्यामुळे पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. या वक्तव्यामुळे राज्यातील प्रशासकीय यंत्रणा आणि सरकारवर (Maharashtra government) दबाव वाढण्याची चिन्हे आहेत.

Anna Hazare warns government over RTI changes
Anna Hazare Hunger Strike : सरकारच्या विरोधात पुन्हा उपोषणाला बसणार! 90व्या वर्षीही अण्णा हजारे यांचा फडणवीस सरकारला थेट इशारा

'RTI'साठी नव्या तरतुदी गुंतागुतींच्या

अण्णा हजारे यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, माहिती अधिकार कायद्यातील नव्या दुरुस्त्यांमुळे माहिती मिळवण्याची प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची बनली आहे. माहिती अर्जासाठी शुल्कवाढ, ओळखपत्र सक्ती, अर्जांवर अतिरिक्त निर्बंध आणि पुनरावृत्ती अर्ज निकाली काढण्याच्या नव्या तरतुदींमुळे पारदर्शकता कमी होत असून सरकारचा माहितीचा अधिकार मजबूत करण्याचा कोणताही हेतू दिसत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

Anna Hazare warns government over RTI changes
Anna Hazare on Arvind Kejriwal : अरविंद आता दूर गेलाय; 90व्या वाढदिवशी अण्णांची प्रतिक्रिया चर्चेत, अरविंद केजरीवाल यांना टोला?

फोडाफोडीच्या राजकारणावर नाराजी

याचवेळी सध्या राज्यात आणि देशात सुरू असलेल्या ‘फोडाफोडीच्या राजकारणा’वरही अण्णा हजारे यांनी जोरदार नाराजी व्यक्त केली. पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, देशात लोकशाही आहे म्हणून लोकशाहीला विरोध नाही. पण सध्याच्या राजकारणात तत्त्व आणि निष्ठा उरलेली नाही. वारंवार पक्ष बदलणाऱ्या नेत्यांना कोणतेही ध्येय नसते, ते फक्त स्वार्थासाठी राजकारण करत आहेत.

अण्णांचा सरकारविरोधात संघर्ष पेटणार?

आता बुधवारी होणाऱ्या राळेगणसिद्धीतील बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, सरकार आणि अण्णा हजारे यांच्यातील या चर्चेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवा संघर्ष उभा राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com