Anup Agrawal Politics: भाजप Vs काँग्रेस राजकारण...आमदार अग्रवाल आणि खासदार बच्छाव यांच्यात रंगला श्रेयवाद

Anup Agrawal; BJP MLA Anup Agrawal target Congress MP Dr Shobha Bacchav on development issue-आमदार अनुप अग्रवाल म्हणतात, काँग्रेसच्या खासदार शोभा बच्छाव यांच्या विकासाच्या प्रश्नावर आयत्या पिठावर रेघा
Dr Shobha Bacchav & Anup Agrawal
Dr Shobha Bacchav & Anup AgrawalSarkarnama
Published on
Updated on

Anup Agrawal News: केंद्रात आणि राज्यात डबल इंजिन सरकार असल्याने भाजप नेते प्रत्येक कामाचे श्रेय कोणाचे? असा राजकीय प्रश्न करीत असतात. धुळे शहरातील पांझरा नदीच्या पुलावरूनही असाच वाद सुरू झाला आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे.

धुळे शहरातील पुलाच्या बांधकामांचे भाजप आमदार अनुप अग्रवाल यांनी स्वतःकडे घेतले आहे. आपण राज्य आणि केंद्र शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळेच मंजुरी मिळाली आहे. अन्य कोणी त्या कामाचे श्रेय घेऊ नये, असा दावा आमदार अनुप अग्रवाल यांनी केला आहे.

धुळे शहरातील पांझरा नदीवरील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्यानेजिक लहान मुलाच्या कामाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मान्यता दिली. खासदार डॉ शोभा बच्छाव यांनी याबाबत माहिती दिली होती. केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा केल्यामुळे या कामाला मंजुरी मिळाल्याचा दावा देखील खासदार बच्छाव यांचा होता.

Dr Shobha Bacchav & Anup Agrawal
Raut Vs Mahajan Politics: संजय राऊत यांचा पलटवार, "गिरीश महाजन तुम्ही प्रमोद महाजन नव्हे, जामनेरचे महाजन आहात"

त्यावर भाजपचे आमदार अनुप अग्रवाल यांनी त्यांच्यावर राजकीय हल्ला केला आहे. काँग्रेसच्या खासदार डॉ. बच्छाव त्यांनी न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. असा कोणताही लहान पूल मंजूर झाला नसल्याचा दावा करीत, खासदार डॉ बच्छाव विकासकामांबाबत आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचं काम करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.

पांझरा नदीवर ब्रिटिशकालीन पूल होता. आपुल जुना झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्याचे सर्वेक्षण करण्यात आले. हा पूल लहान वाहनांच्या वाहतुकीसाठी सक्षम असून तो पाडण्यात येऊ नये असा अहवाल या विभागाच्या अधीक्षक अभियान त्यांनी दिला होता. त्यामुळे या ठिकाणी कोणताही नवा पूल मंजूर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असा दावा आमदार अग्रवाल यांनी केला.

आपण केलेल्या पाठपुराव्यामुळे २०२२ मध्ये केंद्रीय भूपृष्ठही वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या पुलासाठी ९ कोटी रुपये मंजूर केली होते. त्यानंतर राज्य शासनाकडे नुकताच पाठपुरावा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाने मेहेरगाव धुळे अंमळनेर रस्त्यावर नवीन पूल मंजूर करण्यात आला आहे. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलासाठी निधी देखील मंजूर केलेला आहे.

धुळे शहरातील विविध प्रश्नांवरून भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये सातत्याने श्रेयवादाचे राजकारण रंगत आले आहे. आता त्यात काँग्रेसच्या खासदार डॉ बच्छाव यांचाही समावेश झाला आहे. शहरातील जी जी विकास कामे होतील त्याच्या श्रेय भाजपला हवे असते. त्यामुळे धुळे शहरातील नागरिकांसाठी लोकप्रतिनिधींमध्ये हे आरोप, प्रत्यारोप नवीन नाहीत.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com