Jalgaon crime: धक्कादायक, पोलिस ठाण्यातूनचसुरू होती सोन्याची दामदुप्पट योजना, चक्क पोलिसांनाच गंडा!

Archana Patil; Jalgaon, a female police cheated colligue police by gold scheme-सोने गुंतवणुकीच्या माध्यमातून जळगाव पोलीस ठाण्यात चक्क महिला पोलिसांची फसवणूक
Police Constable Archana Patil
Police Constable Archana PatilSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon police News: दाम दुप्पट योजना आणि ज्यादा व्याजाचे अमित दाखवून होणाऱ्या आर्थिक फसवणूक नवी नाही. असे अनेक प्रकार सगळीकडे घडत असतात. मात्र जळगाव शहरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

जळगाव पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचारी अर्चना पाटील यांनी एक वेगळाच फंडा वापरला. त्यामुळे पोलिसांनाही धक्का बसला आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकारी महिलांनाच गंडा घातला, तो देखील चक्क पोलिस ठाण्यातच.

Police Constable Archana Patil
Ajit Pawar Politics: बैठक अजित पवारांची, चर्चा मात्र शिक्षण मंत्री दादा भुसे यांची, हे ठरले निमित्त!

आर्थिक फसवणुकीपासून सावधान राहण्यासाठी पोलीस सातत्याने नागरिकांना सावध करीत असतात. मात्र जळगाव शहरात एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकारी महिला पोलिसांनाच मोठा गंडा घातला आहे. या आगळ्यावेगळ्या आर्थिक फसवणुकीमुळे जळगाव पोलीस चर्चेत आले आहेत.

Police Constable Archana Patil
Eknath Shinde Politics: भाजप कार्यालयावर हल्ला करणाऱ्याचा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले स्वागत...काय आहे कारण?

अर्चना पाटील या पोलीस कॉन्स्टेबलने सहकारी महिला पोलीस व कर्मचाऱ्यांना सोने गुंतवणूक योजनेचे आम्ही दाखवले. या योजनेत पैसे गुंतवल्यास दरमहा दहा टक्के परतावा मिळेल, असे आमीष तिने दाखवले. त्याला अनेक महिला कर्मचारी बळी पडल्या. सुरुवातीला काही महिला कर्मचाऱ्यांना पैसे देखील मिळाले. मात्र नंतर अर्चना पाटील हिने पैसे देण्यात खंड पडला. त्यामुळे सावध झालेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी याबाबत तक्रार केली. खुद्द पोलिसांनीच पोलिसांना फसवल्याने हे प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे.

आतापर्यंत तीन महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी याबाबत तक्रार केली आहे. अन्य महिला कर्मचारी मात्र गंडवल्या गेल्याची भावना आणि वरिष्ठांकडे प्रतिमा मलीन होईल, या भीतीने तक्रार देण्यास पुढे येत नाहीत. खाजगी मध्ये अनेक महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी आमची ही फसवणूक झाल्याचे सांगितले आहे. पोलीस कॉन्स्टेबल अर्चना पाटील हिला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने तिची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.

या दरम्यान अधिकाऱ्यांनी तिचा विविध प्रकारे तपास केला. यामध्ये तिच्या घरात छापा देखील टाकण्यात आला. मात्र या छाप्यात अवघे साडेतीनशे रुपये आणि कानातील डूल एवढेच आढळले. त्यामुळे हा तपास पूर्ण करणे पोलीस अधिकाऱ्यांनाही एक आव्हान ठरले आहे.

कोण आहेत अर्चना पाटील?

अर्चना पाटील ही महिला अतिशय सामान्य कुटुंबातील होती. प्रारंभी तिने मुंबईत पोळ्या लाटण्याचे काम करून कुटुंबाला मदत केली. त्यानंतर ती महापालिकेत नोकरीला लागली. साधारणतः दहा वर्षांपूर्वी ती पोलीस दलात भरती झाली. त्यानंतर तिची बदली जळगाव येथे झाली. यादरम्यान नोकरीत असताना तिने व्याजाने पैसे देण्याचे काम केले. या आर्थिक घोटाळ्यात अडकल्याने तिने सोन्यात गुंतवणूक करून दाम दुप्पट योजनेचे अमित सहकारी पोलीस व महिलांना दिले.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com