Arunbhai Gujarati Politics: धक्कादायक, `बदलापूर`ची पुनरावृत्ती, चोपडा येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचारानंतर खून!

Mahavikas Aghadi Aggressive on Abuse of Tribal Girl: राज्य सरकारचा दरारा संपला का? आरोपीला फाशी देण्याची मागणी करीत महाविकास आघाडीने काढला मोर्चा.
Arun Gujarati with Mahavikas Aghadi Morcha
Arun Gujarati with Mahavikas Aghadi MorchaSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Politics: राज्यभर महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत. त्यावर समाजात संत प्रतिक्रिया होत आहे. राज्य सरकारने याबाबत विविध उपायोजना करण्याच्या घोषणा केल्या आहेत. मात्र बदलापूर सारख्या अत्याचाराच्या घटना वाढतच आहेत.

बदलापूर येथील घटनेनंतर राज्य सरकार आणि गृह विभाग यांच्या विरोधात समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. याबाबत राज्यभर निदर्शने आणि आंदोलने झाली. मात्र अद्यापही त्या घटनांची पुनरावृत्ती सुरूच आहे.

राज्यात सरकारचा दरारा दिसेनासा झाला आहे. महिला अत्याचाराच्या घटना घडतच आहे. चोपडा येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये संताप प्रतिक्रिया उमटली. या विरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्य शासनाविरोधात मोर्चा काढला. तहसीलदारांना निवेदन दिले.

विरवाडे (चोपडा) येथे आदिवासी आश्रम शाळेतील बारा वर्षांच्या आदिवासी मुलीवर अत्याचार झाला. त्यानंतर या मुलीचा दगडाने ठेचून खून करणारी संतापजनक घटना घडली. त्यामुळे विद्यार्थिनींमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

Arun Gujarati with Mahavikas Aghadi Morcha
Dr Heena Gavit Politics: हिना गावित यांनी खासदार पाडवी यांना फटकारले, काय आहे कारण?

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तीव्र निषेध केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी आमदार जगदीश वळवी, अॅड घनश्याम पाटील, सामाजिक कार्यकर्त्या ज्योती पावरा, रोहिणी पाटील, गोकुळ पाटील यांसह असंख्य कार्यकर्त्यांनी शासकीय विश्रामगृहापासून मूक मोर्चा काढला.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते तहसीलदार कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्या आला. त्यानंतर तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले. पोलिसांचा गुन्हेगारांवरील दरारा संपला आहे. सरकारचा धाक राहिलेला नाही. त्यामुळे गुन्हेगार मोकाट सुटले आहेत.

महिला अत्याचाराच्या घटना थांबण्याची चिन्हे नाहीत. अल्पवयीन आदिवासी विद्यार्थीनीवर अत्याचार झाला. यावर ठोस कारवाई करावी. वीरवाडे येथील अत्याचाराच्या घटनेतील आरोपीला तातडीने अटक करून फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Arun Gujarati with Mahavikas Aghadi Morcha
Governer Radhakrishnan: पालकमंत्र्यांच्या उपस्थितीतच सत्ताधारी आमदारांचे राज्यपालांकडे समस्यांचे रडगाणे!

यावेळी काढण्यात आलेल्या मोर्चात महिला आणि विद्यार्थिनी देखील सहभागी झाल्या होत्या. संबंधित विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचारानंतर शिक्षण क्षेत्रातही तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र त्यावर तातडीने कार्यवाही झाली नाही.

संबंधित आरोपीला अटक करण्यात आली नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. पोलिसांच्या ढिसाळ कारभारामुळे गुन्हेगारीला मोकळे रान मिळण्याची स्थिती आहे. त्यामुळे या संदर्भात वरिष्ठांनी तातडीने हस्तक्षेप करून गंभीर उपाययोजना करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या घटनेनंतर राज्य शासन जागे होईल का? सध्याचे सरकार केवळ योजनांचा डांगोरा फिटण्यात व्यस्त आहे. निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहे. त्यांना या वाढणाऱ्या गुन्हेगारी आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराची दखल घ्यायला वेळ आहे का? असा सवाल या नेत्यांनी केला.

एकंदरच राज्यभर बदलापूरच्या घटनेनंतर सरकारविषयी तीव्र नाराजी निर्माण झाली होती. त्यानंतरही अशा घटना घडतच असल्याने पोलीस यंत्रणेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com