Arvind Sawant Politics: खासदार अरविंद सावंत म्हणाले, ...तर गुजरातमध्ये शिवसेना फोफावली असती!

Arvind Sawant; They have forgotten that Balasaheb Thackeray gave life to the BJP-भारतीय जनता पक्ष हा त्याला मोठं करणाऱ्यांनाच विसरणारा अत्यंत कोत्या वृत्तीच्या गॅंगचा पक्ष!
Arvind Sawant
Arvind SawantSarkarnama
Published on
Updated on

Arvind Sawant News: भारतीय जनता पक्ष आपला एक अजेंडा घेऊन काम करत आहे. अजेंडा राबविण्यासाठी ते सगळ्यांकडे दुर्लक्ष करतात. हे लोकशाही आणि सहकारी राजकीय पक्षांनाही धोकादायक आहे. त्यामुळे लोकशाही विषयी चिंता करावी अशी स्थिती आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकशाहीचे भवितव्य या विषयावर व्याख्यान दिले. यावेळी त्यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या कामकाजाचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीचा समाचार घेतला. भारतीय जनता पक्ष आपल्यावर उपकार करणाऱ्यांनाच विसरतो, असे ते म्हणाले

Arvind Sawant
Advay Hiray Politics: दादा भुसे जोमात, शिवसेना ठाकरे पक्ष कोमात, अद्वय हिरे आहेत तरी कुठे?

महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला कोणीही विचारत नव्हते. प्रमोद महाजन यांच्या सभेला हजार लोकांचीही गर्दी होत नसे. त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मोठ्या मनाने आपल्या व्यासपीठावर आणून लाखोंची गर्दी मिळवून दिली.

Arvind Sawant
Manikarao Kokate Vs Bachchu Kadu : रात्रभर ताटकळले पण कृषिमंत्री भेटलेच नाही! बच्चू कडूंना माणिकराव कोकाटेंचा चकवा

महाराष्ट्रात ग्रामीण भागात भाजप कोणालाही माहित नव्हता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलदारपणा दाखवून त्यांना बरोबर घेतले. या पक्षाला महाराष्ट्रात जगवले. मात्र भाजप ज्यांनी जगवले त्यांनाच विसरला. हा अत्यंत छोटे मन असलेल्या गॅंगचा हा पक्ष आहे.

गुजरात भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री शंकरसिंग वाघेला हे शिवसेनाप्रमुखांकडे आले होते. त्यांनी भाजपमधून बाहेर पडून शिवसेना पक्षाचा विस्तार गुजरातमध्ये करायचा होता. याची कुणकुण लागताच प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे धावत धावत शिवसेना प्रमुखांकडे आले होते.

शिवसेनाप्रमुखांनी स्वतःहून मी असे काहीही करणार नाही, असे त्यावेळी सांगितले. शिवसेनाप्रमुखांचे मन मोठे होते म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला. अन्यथा गुजरातमध्ये शिवसेनेचा विस्तार झाला असता. भाजपची कोंडी झाली असती, त्यांच्या विस्ताराला लगाम बसला असता, असे खासदार सावंत यांनी सांगितले.

आज मात्र भाजप ज्यांनी त्यांना जगवले त्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाच संपवण्यासाठी आपली सगळी शक्ती खर्च करीत आहे. केंद्रातील सर्व सत्ता आणि तपस यंत्रणांचा वापर त्यासाठी होत आहे. हा लोकशाहीला मोठा धोका आहे. मात्र सुज्ञ नागरिक नक्कीच या प्रवृत्तीला धडा शिकवतील आणि लोकशाहीचे रक्षण करतील असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला.

------

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com