Ram Shinde And Manisha Kayande : राम शिंदेंची 'रत्नदीप'वर लक्षवेधी; मनीषा कायंदे म्हणाल्या, 'प्रकरण मिटवायचा...'

Manisha Kayande participation in Ram Shinde attention : जामखेड तालुक्यातील रत्नदीप मेडिकलमधील विद्यार्थ्यांची होत असलेल्या मानसिक, शारीरिक आणि आर्थिक पिळवणुकीवर मोठं आंदोलन केले. यासंदर्भात भाजप आमदार प्रा. राम शिंदे यांनी लक्षवेधीत मुद्दा उपस्थित केला. यात मनीषा कायंदे यांनी भाग घेतला.
Ram Shinde And Manisha Kayande
Ram Shinde And Manisha KayandeSarkarnama

Ram Shinde News : माजी मंत्री आमदार राम शिंदे यांनी जामखेड तालुक्यातील रत्नदीप मेडिकल फाऊंडेशनमधील विद्यार्थिंनीचे मानसिक, शारीरिक आणि आर्थिक पिळवणुकीवर लक्षवेधी मांडत, उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली.

याच लक्षवेधी दरम्यान, आमदार मनीषा कायंदे यांनी हे प्रकरण गंभीर असून, मिटवायचा प्रयत्न होतोय का? गृहखात्याने लक्ष घालावे, अशी मागणी केली. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्व तक्रारींची सखोल उच्चस्तरीय चौकशी होणार असल्याचे सांगितले.

जामखेड तालुक्यातील रत्नदीप मेडिकलमधील विद्यार्थ्यांनी होत असलेल्या मानसिक, शारीरिक आणि आर्थिक पिळवणुकीवर मोठं आंदोलन केले. आंदोलनाची तीव्रता एवढी होती की, राज्य सरकारने त्याची दखल घेतली. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी रत्नदीप मेडिकल फाऊंडेशनच्या प्रशासनावर गंभीर आरोप केले. त्यामुळे वातावरण अधिकच ढवळून निघाले. याच मुद्यावर कर्जत-जामखेडमधील विधानपरिषदेचे भाजप (BJP) आमदार प्रा. राम शिंदे यांनी लक्षवेधी मांडली. या चर्चेत मनीषा कायंदे यांनी देखील सहभाग घेतला.

Ram Shinde And Manisha Kayande
Nagar Urban Bank Fraud : केंद्रीय सहकार मंत्रालयाचा 'अर्बन'च्या संचालकांना दणका; गैरव्यवहारात मोठा आदेश

या मेडिकल फाऊंडेशनच्या एकाच इमारतीत बीएचएमएस, बीएएमएस, बीएस्सी, नर्सिंग, बी. फार्मसी, डी. फार्मसी, अशी वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत अभ्यासक्रम चालवले जातात. या फाऊंडेशनमधील अभ्यासक्रमात असलेल्या विद्यार्थ्यांनी शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषणाचा आरोप करत पाच मार्चला तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी चौकशी समिती नेमली.

तसेच सर्व शैक्षणिक (Educational) परवानगी रद्द करण्याचा निर्णय घेतला. परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाने म्हटले. आंदोलनानंतर या संस्थेतील बीएचएमएस आणि बी.एस्सी नर्सिंगचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे स्थलांतर झाले. परंतु इतर विद्यार्थ्यांचे स्थलांतर झालेले नाही. त्यामुळे 27 जूनपासून विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलन झाले. या विद्यार्थ्यांचे इतर शैक्षणिक संस्थांमध्ये स्थलांतर करावे, अशी मागणी आमदार राम शिंदे यांनी लावून धरली.

Ram Shinde And Manisha Kayande
Sharad Pawar NCP : राष्ट्रवादीची सरकारला चपराक, 'त्या' अजब मोर्चामुळे अधिकाऱ्यांची पळापळ

दरम्यान, आमदार मनीषा कायंदे यांनी या लक्षवेधी चर्चेत भाग घेतला. एखादे महाविद्यालय सुरू करताना त्यात विविध प्रकारच्या सुविधा आहेत का? यासाठी शिक्षण विभागाच्या विविध समित्या असतात. या समितींनी पाहणी करून काय मूल्यांकन केले होते. महाविद्यालयात अनियमितता कशी झाली? सर्व दोषींवर कारवाई होणार का? मुलींचा प्रश्न गंभीर आहे. या प्रकरणात गुन्हे दाखल झाले असून, आरोपी जामिनावर सुटलेला आहे. हे प्रकरण मिटवायचा प्रयत्न होतो आहे का? यात गृहखात्याने लक्ष द्यावे. महाविद्यालयाच्या आवारात हरिण पाळले होते. यावर वेगळा गुन्हा दाखल केला का? असे प्रश्न मनीषा कायंदे यांनी उपस्थित केला.

उच्च व तंक्षशिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रा. राम शिंदे यांच्या या लक्षवेधीची गंभीर दखल घेतली. या सर्व प्रकरणात उच्चस्तरीय समिती नेमूण सखोल चौकशी होईल, असे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com