Ramgiri Maharaj : रामगिरी महाराजांवर गुन्हे दाखल होताच, इकडं गावकऱ्यांनी घेतला 'हा' पवित्रा...

Movement in Shrirampur in support of Ramgiri Maharaj : रामगिरी महाराजांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर मुस्लिमांकडून गुन्हे दाखल होत आहेत. परंतु अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये रामगिरी महाराजांच्या समर्थनात गाव एकटवला आहे.
Ramgiri Maharaj 1
Ramgiri Maharaj 1Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : सरला बेटावरील मठाधिपती रामगिरी महाराज यांनी मुस्लिमांच्या भावना दुखतील असं वादग्रस्त विधान केलं. यानंतक संपूर्ण राज्यात मुस्लिमांनी रोष व्यक्त करत रस्त्यावर उतरले. रामगिरी महाराज यांच्याविरोधात राज्यभरात वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात धार्मिक भावना दुखवल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

रामगिरी महाराजांच्या विधानानाचा विरोध होत असतानाच, त्यांच्या समर्थनात नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर इथंल्या खैरी निमगांव गावात 'रास्ता रोको' झाला. तसंच गोंडेगावात कडकडीत बंद पाळण्यात आला.

योगीराज गंगागिरी महाराजांच्या पांचाळे येथे 177 वा सप्ताह सुरू आहे. रामगिरी महाराज यांच्या प्रवचनासाठी सप्ताह काळात राज्यभरातील भाविकांनी तिथे हजेरी लावतात. शिवसेनेचे पक्ष नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील या सप्हाताला हजेरी लावली. याच रामगिरी महाराज यांनी मुस्लिमांच्या भावना दुखतील, असं विधान केल्याचा आरोप आहे. या विधानाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर वेगानं व्हायरल होत आहे.

या विधानावर रामगिरी महाराज यांच्याविरोधात मुस्लिम समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. याशिवाय रामगिरी महाराज यांच्याविरोधात राज्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात धार्मिक भावना दुखवल्याच्या मुस्लिमांकडून तक्रारी दाखल झाल्या आहेत. मात्र आता रामगिरी महाराज यांच्या समर्थनात हिंदू संघटना पुढे येऊ लागल्यात. शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील काही नेत्यांनी त्यांचे समर्थन देखील सुरू केल्याचे दिसते.

Ramgiri Maharaj 1
Radhakrishna Vikhe Ramgiri Maharaj : रामगिरी महाराजांचे विधान, मंत्री विखेंचा राजकारण करणाऱ्यांना इशारा...

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमधील खैरी निमगावमधील ग्रामस्थांनी रामगिरी महाराज यांच्या समर्थनात 'रास्ता रोको' आंदोलन केले. श्रीरामपूर-पुणतांबा रस्त्यावर हे आंदोलन झालं. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. रामगिरी महाराज यांनी बांगलादेशातील परिस्थिती मांडली. तिथं हिंदुंवर (Hindu) होत असलेल्या अत्याचाराला वाचा फोडली.

रामगिरी महाराज यांना आता त्यांच्या विधानावरून जाणिवपूर्वक त्रास दिला जातोय. समाजात तेढ वाढेल, असे कृत्य करण्यास काही समाजकंटकांकडून फूस लावली जात आहे. रामगिरी महाराजांच्याभोवती सुरू असलेले षडयंत्र थांबवण्यासाठी सरकारने कठोर पावलं उचलावीत, अशी मागणी खैरी निमगाव ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली. पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारत कारवाईचे आश्वासन दिले.

Ramgiri Maharaj 1
Dada Bhuse Politics: दादा भुसे यांनी रामगिरी यांच्या वक्तव्याबाबत झटकले हात!

रामगिरी महाराजांविरोधात श्रीरामपूरमध्ये गुन्हा दाखल

रामगिरी महाराज यांनी केलेल्या विधानावरून मुस्लिम समाज आंदोलनं केली आहेत. यातून काहींनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. धार्मिक भावना दुखावल्या गेल्याप्रकरणी श्रीरामपूर पोलिस ठाण्यात देखील गुन्हा दाखल झाला आहे. सरवर अली यांनी फिर्याद दिली आहे. या विधानाचा निषेध करण्यासाठी श्रीरामपुरात निषेध सभा देखील झाली.

सराला बेटावर पोलिस बंदोबस्त वाढवला

मुस्लिम समाज आक्रमक झाल्याने काहीसा तणाव आहे. सराला बेटावर देखील पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सरला बेटावर येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी पोलिसांकडून होत आहे. श्रीरामपूर शहरात शुक्रवारी दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी परिस्थिती कौशल्याने हाताळून परिस्थिती नियंत्रणात आणली. त्याबद्दल नागरिकांकडून कौतुक होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com