Ashutosh Kale Won Kopargaon Assembly Election 2024 : भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजनामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार आशुतोष काळे यांचा एकतर्फी विजय कोपरगाव मतदारसंघात झाला आहे.
तब्बल एक मतांनी काळे यांनी विजय मिळवला आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून आशुतोष काळे आघाडीवर होते.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघात भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavi) यांनी युवा नेते विवेक कोल्हे यांची बंडखोरी रोखण्यात यश मिळवल्याने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. फडणवीस यांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि त्यांचा पुत्र विवेक कोल्हे यांची थेट अमित शाह यांच्याशी दिल्ली इथं बैठक घडवून आणली. अमित शाह यांच्याकडून मोठा शब्द मिळाल्याने आणि भाजपला भविष्यात अहिल्यानगर जिल्ह्यात युवा चेहरा हवा असल्याने विवेक कोल्हे यांना रोखण्यात आल्याचे सांगितले जाते.
विवेक कोल्हे हा संघर्षाचा युवा चेहरा असल्याचे देवेंद्र फडणवीस यांना हेरलं. विवेक कोल्हे यांनी त्यांचे मातुश्री स्नेहलता कोल्हे यांचा 2019च्या निवडणुकीत पराभव झाल्यापासून अॅटीव्ह झाले आहेत. विखे-कोल्हे-काळे, असा राजकीय संघर्ष जिल्ह्याताल सर्वश्रुत आहे. स्नेहलता कोल्हे यांचा 2019च्या निवडणुकीत पराभव झाल्यापासून विवेक कोल्हे यांनी विखेंना थेट आव्हान देण्यास सुरवात केली. गणेश सहकारी कारखाना, स्थानिक ग्रामपंचायतीच्या निवडणुका, शिर्डी (Shirdi) देवस्थान सोसायटीच्या निवडणुकीत त्यांना एकहाती यश मिळवलं. तसंच नाशिक शिक्षक मतदारसंघात देखील दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. आता विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारी सुरू केली होती.
विवेक कोल्हे यांच्या तयारीचा धसका सर्वाधिक अजित पवार यांच्या उमेदवार आमदार आशुतोष काळे यांना घेतला होता. निवडणुकीच्या तोंडावर काळे-कोल्हे यांचा संघर्ष चांगलाच पेटला. यातच कोल्हे यांचा शरद पवार यांच्याबरोबर झालेला प्रवास चर्चेत आला. त्यामुळे विवेक कोल्हे यांना रोखण्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस यांना पुढाकार घ्यावा लागला. विवेक कोल्हे यांचा संघर्ष लक्षात घेऊन फडणवीस यांनी अमित शाह यांच्याबरोबर कोल्हे मायलेकाची यशस्वी बैठक घडवून आणली.
विवेक कोल्हे यांनी बंडाची तलवार म्यान केल्याने शरद पवार यांनी कोपरगावमधील त्यांच्या पक्षाचे युवा कार्यकर्ते आणि जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांना संधी दिली. संदीप वर्पे यांनी देखील ऐनवेळी मिळालेल्या उमेदवारीचे सोनं करण्यासाठी ताकदपणाला लावली. ग्राऊंड लेवलचा कार्यकर्ता असल्याने संदीप वर्पे यांनी देखील आमदार काळे यांच्यासमोर चांगलेच आव्हान उभे केले होते. शरद पवार यांनी कोपरगावात सभा घेऊन वर्पे यांना बळ दिले. यातून आमदार आशुतोष काळे यांनी मार्ग काढण्याची यशस्वी धडपड ठेवली.
मेहबुबखा अहमदखा पठाण (BSP), आशुतोष अशोकराव काळे (NCP), शकील बाबुभाई चोपदार (VBA), शंकर सुकदेव लासुरे (RSPS), कवडे शिवाजी पोपटराव (BALP), संदीप गोरक्षनाथ वर्पे (NCPSP), दिलीप भाऊसाहेब गायकवाड (अपक्ष), किशोर मारुती पवार (अपक्ष), राजेंद्र माधवराव कोल्हे (अपक्ष), मनीषा राजेंद्र कोल्हे (अपक्ष), चंद्रहंस अण्णासाहेब औताडे (अपक्ष), विश्वनाथ पांडुरंग वाघ (अपक्ष), विजय नारायणराव वडांगळे (अपक्ष), बाळासाहेब कारभारी जाधव (अपक्ष), खंडू गहिनीनाथ थोरात (अपक्ष), विजय सुधाकर जाधव (अपक्ष), किरण मधुकर चांदगुडे (अपक्ष), विजय सुभाष भगत (अपक्ष), संजय बाबुताई भास्करराव काळे (अपक्ष), अहिरे प्रभाकर पावजी (अपक्ष), शिवाजी पोपटराव कवडे (अपक्ष).
2019 मध्ये या मतदारसंघातून आशुतोष अशोकराव काळे यांनी निवडणूक जिंकली. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली नव्हती. आशुतोष काळे यांना 87 हजार 566 मतं मिळाली होती. भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांना दुसऱ्या क्रमांकावर राहावे लागले होते, आणि मतांचा फरक केवळ 822 मतांचा होता. स्नेहलता कोल्हे यांना 86 हजार 744 मतं मिळाली होती. 2014 मध्ये भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांनी विजय मिळवला होता. त्यावेळी स्नेहलता कोल्हे यांना 99 हजार 763 मतं मिळाली होती. दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे आशुतोष काळे होते, त्यांना 70 हजार 493 मतं मिळाली होती. काँग्रेसचे नितीन भानुदास यांना 19 हजार 586 मतं मिळाल्यानंतर ते तिसऱ्या क्रमांकावर होते. यावेळी विजयी उमेदवार आणि दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवार यांच्यातील फरक 29 हजार 270 मतांचा होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.