Vikhe Vs Thorat : 'बाप कोण? जनता दाखवून देईल'; जयश्री थोरातांना विखेंनी कोणता सल्ला दिला

Sujay Vikhe again criticizes Jayashree Thorat: संगमनेर तालुक्यातील साकुर इथं आयोजित मेळाव्यातून भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी पुन्हा बाळासाहेब थोरात यांची कन्या राजश्री थोरात यांच्यावर निशाणा साधला.
Vikhe Vs Thorat
Vikhe Vs ThoratSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांनी जोरदार टोलेबाजी केल्यानंतर भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी पुन्हा सल्ला देत डिवचलं आहे.

"ताईंच्या गाडीत बसणारे त्यांना बोलायला भाग पाडत आहेत. ताईंच्या गाडीत बसलेले लोकच त्यांचा घात करणार असून, त्यांनी त्यांच्यापासून साधव राहा. राहिलं, तालुक्याचा बाप कोण, हे येत्या निवडणुकीत जनता दाखवून देईल", अशी टीका माजी खासदार सुजय विखे यांनी केली.

भाजपचे (BJP) माजी खासदार सुजय विखे यांचा संगमनेर तालुक्यातील साकूर इथं युवा संकल्प मेळावा झाला. यात सुजय विखे यांनी जयश्री थोरात यांच्या टिकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. 'संगमनेर तालुक्यातील जनतेन तुमचा 40 वर्षाचा कारभार पाहायलाय. त्यामुळे तालुक्याच्या आमदारांच्या निष्क्रीयतेवर बोललो, तर राग यायचे कारण काय? अहो ताई,लोकाशाही प्रक्रियेत मायबाप जनता बाप असते. तालुक्याचा बाप कोण हे येत्या निवडणुकीत जनता दाखवून देईल', असे सडोतोड सुजय विखे यांनी दिले.

Vikhe Vs Thorat
Satyajeet Tambe And Devendra Fadnavis : फडणवीस-तांबेंची खरंच भेट झाली का? 'सरकारनामा'च्या हाती मोठी माहिती

सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी वर्षवर्षानुवर्षे ज्या जनतेन निवडून दिले, त्यांचा बाप तालुक्याच्या राजकन्या काढायला निघाल्यात. पण कोणाच्या बापाबद्दल नाही, तर तालुक्याच्या आमदाराच्या निष्क्रीयेतवर बोललो. लोकशाही प्रक्रियेत जनता मायबाप असते. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता ठरवेल, तालुक्याचा बाप कोण? पण ताईच्या गाडीत बसणारे त्यांना बोलायला भाग पाडत आहेत. ताईच्या गाडीत बसलेले लोकच त्यांचा घात करतील, असेही म्हणाले.

Vikhe Vs Thorat
Sharad Pawar : साहेबांचा आदेश, मतदारसंघात जा; `एबी फॉर्म`ने वाढवली इच्छुकांची घालमेल!

आवाज घरापर्यंत येईल

'संगमनेर तालुक्यातील युवकांनी मनगटातील ताकद दाखवून, या प्रस्थापितांना धडा शिकवावा, असे आवाहन करत आमचा आवाज तुम्ही दाबू शकत नाही, जेवढा आवाज दाबाल, तेवढा तुमच्या घरापर्यंत येईल', असे सुजय विखे यांनी ठणकावून सांगितले.

आमदार थोरातांवर टीका

सुजय विखे यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांचा नामोल्लेख टाळून टीका केली. 40 वर्षे सर्व सत्तास्थान असूनही पठार भागाच्या जनतेला पाणी मिळवून देता आले नाही. या भागात युवकांना रोजगाराच्या संधी नाहीत.या निष्क्रियतेवर बोललो, तर तुम्ही थेट बाप काढाला. आमच्या भागात येवून आमच्या वडिलांवर वाटेल, तशी टीका केली. पण आम्ही संयम दाखवून राजकारण करणारी माणसं आहोत. सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी विखे परिवाराने नेहमीच आवाज उठवला. या तालुक्यातील प्रस्थापितांच्या विरोधात आवाज उठवायला आम्ही आलो आहोत. साकूरची सभा प्रस्थापितांच्या विरोधातील परिवर्तनाची नांदी ठरणार असल्याचा विश्वास विखे यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com