Congress Candidate List : काँग्रेसच्या 'या' विद्यमान आमदाराचा पत्ता कट, युवा चेहऱ्याला संधी

Assembly Election 2024 Congress Candidate Second List Ahilyanagar sitting MLA rejected candidature : काँग्रेसने उमेदवारांच्या दुसरी यादी जाहीर केली आहे. यात अहिल्यानगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या विद्यमान आमदाराचा पत्ता कट झाला आहे. काँग्रेसने इथं युवा चेहऱ्याला संधी दिली आहे.
Congress Candidate List
Congress Candidate ListSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक आमदार लहू कानडे यांच्या उमेदवारीला धक्का बसला आहे. काँग्रेसने त्यांची विधानसभेची दुसरी टर्म रोखली आहे.

काँग्रेसने दुसऱ्या यादी जाहीर करताना आमदार कानडे यांना वगळून युवा नेते हेमंत ओगले यांना संधी दिली आहे. काँग्रेसच्या या निर्णयावर लहू कानडे काय भूमिका घेतात, याकडे आता लक्ष लागलं आहे.

काँग्रेसने (Congress) विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर केली आहे. यात 23 जणांना उमेदवारी जाहीर केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील राखीव श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार लहू कानडे यांना उमेदवारी देण्याऐवजी युवा नेते हेमंत ओगले यांना संधी देण्यात आली आहे.

Congress Candidate List
Satyajeet Tambe Vs Sujay Vikhe : बहिणीसाठी आमदार तांबे मैदानात; सुजय विखेंना सुनावलं, हीच का 'ती' घाणेरडी पातळी...

आमदार लहू कानडे आणि हेमंत ओगले यांच्यात उमेदवारीसाठी रस्सीखेच होती. दोघांनी मतदारसंघात उमेदवारी मिळवण्यापूर्वी यात्रा काढल्या होत्या. हेमंत ओगले यांना युवा नेते करण ससाणे यांचे मोठे समर्थन मिळाले. हेमंत ओगले आमदार कानडेंविरोधात चांगलेच आक्रमक झाले होते. आमदार कानडे यांनी देखील जशास, तसे उत्तर देते.

Congress Candidate List
Today Top 10 Headlines : काँग्रेस अन् शिवसेना ठाकरे पक्षाची दुसरी यादी जाहीर; अजितदादांची डोकेदुखी वाढली - वाचा महत्त्वाच्या घडामोडी

काँग्रेसचे पक्ष निरीक्षक शिर्डीत (Shirdi) आल्यावर तिथं आमदार कानडे आणि ओगले समर्थक यांच्यात वाद झाला होता. हेमंत ओगले यांनी आमदार कानडे यांच्यावर पक्ष निरीक्षकांसमोर गंभीर आरोप केले होते. यानंतर दोघांमध्ये चांगलेच वातावरण तापले. उमेदवारी मिळवण्यासाठी हेमंत ओगले यांनी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. त्याचवेळी आमदार कानडे यांनी देखील ताकद लावली होती. परंतु आमदार कानडे कमी पडले आणि हेमंत ओगले यांनी संधी साधली.

आमदार कानडे आणि हेमंत ओगले यांच्यात वाद वाढत असताना, काँग्रेसची प्रतिष्ठा जपा असा सल्ला ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरातांनी दिला होता. हेमंत ओगले यांना मोठेपणा दाखवा, असे सांगून आमदार कानडे यांना देखील संयम राखण्याचा सल्ला दिला होता. आता हेमंत ओगले यांना उमेदवारी जाहीर झाल्याने आमदार कानडे काय भूमिका घेतात, याकडे आता लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com