Thorat Vs Vikhe : आता थोरातांनी विखेंना ललकारलं; म्हणाले, 'होऊन जाऊ दे'

Balasaheb Thorat Criticized Minister Radhakrishna Vikhe : अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी मतदारसंघातील मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या लोणी खुर्द गावात, बालेकिल्ल्यात शिरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरातांनी मंत्री विखेंना ललकारलं आहे.
Thorat Vs Vikhe
Thorat Vs VikheSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे, त्यांचे पुत्र माजी खासदार सुजय विखे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात आणि त्यांची कन्या जयश्री थोरात यांच्यात कमालीचा राजकीय संघर्ष पेटला आहे.

भाजपचे माजी खासदार सुजय यांच्या सभेत जयश्री थोरात यांच्यावर आक्षेपार्ह टीका झाल्यापासून बाळासाहेब थोरात देखील कमलीचे आक्रमक झाले आहेत. शिर्डी मतदारसंघात लोणी गावात काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ सभेच्या निमित्ताने बाळासाहेब थोरात यांनी मंत्री विखेंना त्यांच्याच बालेकिल्ल्यात ललकारी दिली.

बाळासाहेब थोरात यांनी विकास आणि दहशतीच्या मुद्यावर समोरासमोर येऊन चर्चेत आमंत्रण मंत्री विखेंना (Radhakrishna Vikhe) दिले. थोरात म्हणाले, "आता बस्स झालं, होऊनच जाऊ दे. विकासाबाबत आणि दहशतीबाबत तुलना होऊच जाऊ द्या". महसूल मंत्री असताना शेती महामंडळाच्या जमिनी मी वाटल्या.

निळवंडे धरण पूर्ण करून, पाणी मी आणले. तुम्ही फक्त पाणी सोडले, अगदी ज्यांनी या कामात मदत केली, ते ज्येष्ठ नेते पिचडसाहेबांना तुम्ही धरणावर सुद्धा नेले नाहीत, अरे हा किती कृतघ्नपणा आहे, असा टोला थोरातांनी लगावला.

Thorat Vs Vikhe
ShivSenaUBT : संजय राऊतांनी जागा विकली; शिवसैनिकांची 'मविआ'त बंडखोरीची तयारी

'राज्याचे लक्ष संगमनेर आणि शिर्डी (Shirdi) विधानसभा मतदार संघाकडे लागले आहे. सर्वसामान्य जनतेच्या आनंद निर्माण करण्यासाठी ही लढाई आहे. संगमनेरच्या धांदरफळ येथील सभेमध्ये वसंत देशमुख वाईट बोलला.

तो विखे यांचा पट्टा घालून फिरत असतो. त्याने डॉ. जयश्री थोरातांचा अपमान केला, तेव्हा विखे टाळ्या वाजवत होते. म्हणून या घटनेला तुम्ही जबाबदार आहात', असा गंभीर आरोप थोरातांनी केला.

Thorat Vs Vikhe
Jayant Patil : 'घोषणाबाजांची खुर्ची जनताच हिसकावून घेणार'; जयंत पाटलांची भरपूर टोलेबाजी

"संगमनेर तालुक्यातील राजकारण आणि समाजकारणावर बोलताना थोरात म्हणाले, विरोधक सुद्धा आमचा आदर करतात. आम्ही त्यांना सन्मानाने वागवतो. गणेश कारखाना आम्ही चांगला चालवला तीन हजार रुपये भाव दिला.

तुम्ही प्रवरानगर कारखान्यात मागील दहा वर्ष काय भाव दिला, ते जनतेला सांगा, असे सांगताना मी डॉ. जयश्रीचा बाप आहे, तसा स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात यांचा मुलगा आहे, हे विसरू नका", असा इशारा देखील थोरातांनी दिला.

हे कसले टायगर : खासदार लंके

खासदार नीलेश लंके यांनी देखील यावेळी जोरदार टोलेबाजी केली. ते म्हणाले, "प्रवरा परिसरात त्यांची मोठी दहशत आहे. पण एकच सांगतो, त्यांचीच यंत्रणा फुटीर आहे. प्रवृत्तींचे विचार घाणेरडे असून, हे कसले टायगर.

मांजरीने वाघाचे कातडे पांगरले म्हणून टायगर कोणी होत नाही". राज्यात मविआचे सरकार येणार आहे, असे सांगून प्रशासनाने आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करू नका. दडपशाही करू नका अन्यथा उलटी गिनती आम्ही करू शकतो, असा इशारा खासदार लंकेंनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com