Assembly Election 2024 : सोशल मीडियावर निवडणूक आयोगाची करडी नजर; 24 जणांना नोटीस

Election Commission notice to 24 persons of Ahilyanagar district in case of publication of advertisement without permission on social media : सोशल मीडियावर विनापरवानगी जाहिरात प्रसिद्ध केल्याबद्दल अहिल्यानगर जिल्ह्यात निवडणूक आयोग अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे.
Election Commission
Election CommissionSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News : विधानसभा निवडणुकीत सोशल मीडियावरून आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी माध्यम नियंत्रण कक्षाकडून सखोल तपासणी केली जात आहे. फेसबुक, एक्स, इंस्टाग्राम, यूट्युब या सोशल मीडियावरून निवडणूकविषयक जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी पूर्वप्रमाणिकरण करणे निवडणूक आयोगाने बंधनकारक केले आहे.

त्यानुसार सोशल मीडियावर करडी नजर ठेवत विनापरवानगी जाहिराती प्रसिद्ध केल्याबद्दल अहिल्यानगर जिल्ह्यातील 24 जणांना आयोगाने नोटीस बजावली आहे. त्यामध्ये खुद्द नऊ उमेदवारांचा देखील समावेश आहे. नोटीस मिळताच सोशल मीडियावर प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या जाहिराती आता बंद झाल्या आहेत.

आदेशानुसार विनापरवानगी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती सोशल मीडियावरून (Social Media) हटवण्यात आल्या. प्रमाणिकरण केल्याशिवाय सोशल मीडियावर जाहिराती करता येणार नसल्यामुळे अनेकांनी वैयक्तिक खात्यावरून पोस्ट टाकण्याचा पर्याय निवडला आहे. पोस्ट टाकण्यास परवानगी असल्याचा पुरेपूर फायदा उमेदवारांचे फॉलोवर्स घेताना दिसतात. परंतु काही जणांकडून सोशल मीडियावर नको ती माहिती आक्षेपार्ह शब्दांत पोस्ट केली जाते. अशा पोस्ट्स वर सायबर पोलिसांची करडी नजर आहे.

Election Commission
Prithviraj Chavan Vs Devendra Fadnavis : मोदींचा 'तो' फोटो शेअर करत चव्हाणांनी फडणवीसांना बरच काही सुनावलं

इंस्टाग्राम या समाज माध्यमावर द्वेषपूर्ण पोस्ट करणारी दोन खाती बंद करावी, अशी सूचना सायबर पोलिसांनी (Police) मेटा कंपनीला दिली आहे. अशा प्रकारांमुळे रीतसर जाहिरात करण्याचे व जाहिरात करताना पूर्वपरवानगी घेण्याचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत 75 जाहिरातींचे प्रमाणिकरण झाल्याचे समितीने सांगितले.

Election Commission
Hemant Godse : महायुतीत खटके उडाले, "समीर भुजबळ यांनी माघार घ्यावी"

सोशल मीडियावरून प्रसारित होणाऱ्या जाहिरातींना परवानगी देण्यासाठी तसेच विना परवानगी प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींवर लक्ष ठेवण्यासाठी माध्यम संनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करत आहे. जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे हे माध्यम नियंत्रण कक्षाचे सचिव असून प्रत्येक मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी, सायबर पोलीस प्रतिनिधी, पत्रकार आदी सोशल मीडियावर देखरेख करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com