PM Narendra Modi : मोदी महायुतीच्या सत्तेसाठी आक्रमक; काँग्रेस, नेहरू, गांधी परिवाराच्या जातीच्या राजकारणावर घणाघात

PM Narendra Modi Criticized Gandhi family: धुळे जिल्ह्यात महायुतीच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या आरक्षण आणि जातीविरोधी राजकारणावर जोरदार टीका केली.
PM Narendra Modi
PM Narendra Modi Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची पहिली प्रचार सभा झाली. पंतप्रधान मोदी यांनी या सभेत आक्रमक भाषण करत पहिल्यापासून काँग्रेसला टार्गेट केले. लोकसभा निवडणुकीपेक्षा यावेळी त्यांच्या भाषणेचा आवेश जास्तच होता. काँग्रेस देशात करत असलेल्या आरक्षण आणि जातीच्या राजकारणावरून पंतप्रधान मोदींनी चांगलच फटकारलं.

"पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि आता त्यांची चौथी पिढी राहुल गांधी (राहुल गांधींचा उल्लेख युवराज केला.) आरक्षण विरोधी असून, जातीजातीत वाद लावण्याचे काम काँग्रेस करत आहे. काँग्रेसच्या पाकिस्तानी अजेंड्याला देशात स्थान देऊ नका", असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल 49 मिनिटे भाषण केले. या भाषणात त्यांनी काँग्रेस अन् काँग्रेसवर टीका केली. पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातून त्यांनी काँग्रेसवर (Congress) चांगला गृहपाठ केल्याचे दिसून आले. काँग्रेस खतरनाक साजिश करत आहे, असे सांगून त्यांच्यापासून सावध करण्यासाठी आलो असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.

"महाराष्ट्र, देशाला काँग्रेसच्या या साजिशपासून सावध करत आहे, असे सांगून काँग्रेस देशात एका जातीला दुसऱ्या जातीशी लढवत आहे. हा खतरनाक खेळ आहे. हा खेळ काँग्रेस दलित, मागास आणि आदिवाशी यांना पुढे जाताना पाहू शकत नाही. स्वातंत्र्य काळात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित, शोषित आणि वंचितांना आरक्षण मिळवून देण्यासाठी, खूप प्रयत्न केले. परंतु नेहरू यांनी आरक्षणविरोधी भूमिका घेतली, असे सांगून गांधी परिवारांनी तिच भूमिका ठेवल्याचा गंभीर आरोप नरेंद्र मोदी यांनी केला.

PM Narendra Modi
Supreme Court : अलीगढ विद्यापीठाबाबत सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; 57 वर्षांपूर्वीचा निर्णय बदलला

पंतप्रधान मोदी (Narendra Modi) म्हणाले, "पंडित नेहरू यांच्याशी संघर्ष केल्यानंतर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षणाची लढाई जिंकली. परंतु नेहरू यांच्यानंतर इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी एससी, एसटी आणि ओबीसींना प्रतिनिधीत्व मिळू नये म्हणून आरक्षणविरोधी भूमिका कायम ठेवली.

एससी, एसटी आणि ओबीसींना यांना कमजोर ठेवण्याचा डाव होता". राजीव गांधी यांनी खुलेआम आरक्षणाला विरोध केला होता. मागास समाज मजबूत आणि एकटवला, तर काँग्रेसचे राजकारण संपेल, म्हणून त्यांनी आरक्षणाला विरोध केला, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

PM Narendra Modi
Top 10 News - भुजबळांनी बाह्या सरसावल्या, भालकेंना मंगळवेढ्यानंतर पंढरपुरातही धक्का : वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

युवराजांचा देखील खतरनाक खेळ...

"राजीव गांधी यांच्यानंतर या परिवाराची चौथी पिढी, युवराज (राहुल गांधी) हाच खतरनाक खेळ खेळत आहे. एसटी, एससी समाजची एकता तोडणे, ओबीसी समाज एकता चकनाचूर करून, प्रत्येक समाज जाती-जातीमध्ये विखुरलेला ठेवण्याचे कारस्थान काँग्रेस करत आहे", असा आरोप करत धुळ्यातील वेगवेगळ्या आदिवासी जातींचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. या जातींना एकमेकांविरोधात लढवण्याचा डाव काँग्रेसचा आहे, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

'एक है तो सैफ है'

"काँग्रेसचा अजेंडा आहे की, देशातील आदिवासी एकमेकांशी लढत ठेवण्याचा. देशातील आदिवासींची सामूहीक ताकद संपण्याचे कारस्थान काँग्रेस करत आहे. काँग्रेसने धर्माच्या नावावर असेच षडयंत्र रचले होते. त्यावेळी देशाची फाळणी झाली होती. आदिवासींबाबत असेच काँग्रेस करत आहे. हे देशातील सर्वात मोठे षडयंत्र आहे. या षडयंत्राला बळी पडायचे नाही. त्यामुळे 'एक है तो सैफ है', असा नारा देत काँग्रेसचा खतरनाक खेळ संपवायचा आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com