नाशिक : पोलिस अधीक्षक (Nashik SP) सचिन पाटील (Sachin Patil) यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नेते डॉ. प्रदीप पवार, (Dr Pradip Pawar) इगतपुरीच्या तहसीलदारांसह सात जणांविरोधात वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात मारहाणींसह ॲट्रॉसिटीनुसार (Atrocity case) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Police registered atrocity case against police & MNS leader)
हा गुन्हा न्यायालयाच्या आदेशाने दाखल करण्यात आला असून, उपविभागीय अधिकारी डॉ. अर्जुन भोसले तपास करीत आहेत. दरम्यान, आयपीएस पोलिस अधिकाऱ्यांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल होण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे.
गोपाळ दगडू लहांगे (रा. लहांगेवाडी, वाडीवऱ्हे, ता. इगतपुरी) यांनी यासंदर्भात जिल्हा व सत्र न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार बुधवारी पहाटे वाडीवऱ्हे पोलिसांत तत्कालीन पोलिस अधीक्षक सचिन पाटील, वाडीवऱ्हेचे पोलिस निरीक्षक अनिल पवार, पोलिस कर्मचारी प्रभाकर खांदवे, तहसीलदार परमेश्वर कासुळे, पुरवठा निरीक्षक भरत भावसार, बी. आर. ढोणे आणि मनसे नेते डॉ. प्रदीप पवार यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.
लहांगे यांच्या फिर्यादीनुसार, गडगडसांगवी येथे त्यांच्या पत्नींच्या नावे शासकीय स्वस्त धान्य दुकान आहे. या दुकानातील धान्य काळ्या बाजारात नेताना ग्रामस्थांनी ३० ऑगस्टला पकडले. हे दुकान सील करून माल ताब्यात घेण्यात आला. यासंदर्भात पुरवठा विभाग आणि पोलिस यांनी कारवाई करीत वाडीवऱ्हे पोलिसांत जीवनावश्य कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता.
याचसंदर्भात ३१ ऑगस्टला वाडीवऱ्हे पोलिसांत लहांगे व त्यांच्या मुलास चौकशीसाठी बोलाविले असता, त्याठिकाणी त्यांनी मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली होती. यासंदर्भात लहांगे यांनी न्यायालयात धाव घेत आपल्याविरोधात खोटे गुन्हे दाखल केल्याचे सांगितले. त्यासंदर्भात न्यायालयाने वाडीवऱ्हे पोलिसांना संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बुधवारी पहाटे गुन्हा दाखल झाला आहे.
कचरे कुटुंबीय आणि डॉ. प्रदीप पवार यांच्यात जमिनीचा वाद असून, तो न्यायप्रविष्ट आहे, असे असतानाही डॉ. पवार यांनी पोलिस अधीक्षक पाटील यांच्या माध्यमातून जमिनीचा कब्जा घेतला. ‘‘ आम्ही आदिवासींची बाजू घेतली. त्याचा राग धरून पदाचा गैरवापर करून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. याबाबत विशेष पोलिस महानिरीक्षक, पोलिस महासंचालकांपर्यंत अर्ज केले आहेत. न्यायालयातही दावा दाखल केला. त्यानुसारच हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा तक्रारदार गोपाळ लहांगे यांनी पत्रकार परिषदेत केला.
---
रेशनचे धान्य काळ्याबाजारात नेताना पकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. शासकीय कर्तव्य पार पाडत असताना अधिकाऱ्याविरोधातच गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिला आहे. याविरोधात आपण मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
- सचिन पाटील, तत्कालीन पोलिस अधीक्षकhttps://www.youtube.com/watch?v=Vc2MUCVTbPk
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.