प्रदीप पेंढारे
Babanrao Dhakane Passed Away : माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या पार्थिवावर आज शनिवारी पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुलगा प्रतापराव ढाकणे यांनी बबनराव यांच्या पार्थिवाला अग्निडाग दिला. यावेळी त्यांच्यासमवेत ऋषिकेश, सिद्धेश आणि प्रभावती ढाकणे होत्या. याप्रसंगी पोलिसांनी बंदुकीतून तीन फैरी हवेत झाडून मानवंदना दिली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
'ढाकणे साहेब अमर रहे... अमर रहे.., परत या... परत या... ढाकणे साहेब परत या..,' अशा घोषणा देत, फुलांनी सजवलेल्या रथातून बबनराव ढाकणे यांचे पार्थिव पाथर्डी शहरातून नेण्यात आले. याप्रसंगी कृषीमंत्री धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, प्रांताधिकारी प्रसाद मते, पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील, तहसीलदार शाम वाडकर यांनी पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन केले.
बबनराव ढाकणे यांचे काल (शुक्रवारी) वृद्धपकाळाने नगरमधील खासगी रुग्णालयात निधन झाले. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पाथर्डी शहरातील व्यावसायिकांनी आज दिवसभर दुकाने बंद ठेवली होती.
बबनराव यांच्या पार्थिव नेण्यासाठी रथ तयार करण्यात आला होता. हा रथ जसजसा पार्थिव घेऊन पुढे जात होता, तसे पाथर्डी शहरातील चौकाचौकात त्यावर पुष्पवृष्टी होत होती. पुष्पचक्र अर्पण करण्यात येत होते.
कृषी धनंजय मुंडे, भगवान गडाचे महंत डाॅ. नामदेवशास्त्री महाराज, खासदार डाॅ. सुजय विखे, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार मोनिका राजळे, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार रोहित पवार, आमदार बबनराव पाचपुते, आमदार सुरेश धस, माजी मंत्री पंडित दौंड, नरेंद्र घुले, भीमराव धोंडे, चंद्रशेखर घुले, भानुदास मुरकुटे, साहेबराव दरेकर यांच्यासह राजकीय नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
''बबनराव यांनी आयुष्यभर संघर्षच केला. शून्यातून विश्व निर्माण केले. सेवा सोसायटीचे चेअरमन ते त्यांचा केंद्रातील मंत्रीपदाचा प्रवास थक्क करणार आहे. जनतेच्या मनात नेहमीच घर करून राहिलेला हा नेता गेल्यान मोठी पोकळी निर्माण झाली आहे.'' अशा शब्दांमध्ये धनंजय मुंडे यांनी शोक व्यक्त केला.
(Edited by- Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.