सुशासनाचा पाया अटलजींचा, पंतप्रधान मोदींनी त्यावर कळस चढवला!

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजपतर्फे परशुराम साईखेडकर नाट्यगृहात व्याख्यान झाले
Centre Minister Prakash Jawadekar.

Centre Minister Prakash Jawadekar.

Sarkarnama

Published on
Updated on

नाशिक : भारतीय जनता पक्षाचे पहिले पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal bihari Bajpayee) यांनी देशात सुशासनाचा (Good Governance) पाया रचला. आता नरेंद्र मोदी (Narendra Modi) त्यावर कळस चढवीत आहेत. नव्या भारतात सुशासनातून अद्‌भुत असे काम उभे राहिले, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Jawdekar) यांनी केले.

<div class="paragraphs"><p>Centre Minister Prakash Jawadekar.</p></div>
रोहिणी खडसे म्हणतात, `मतदारसंघात महिला सुरक्षित नाही`

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजपतर्फे परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सुशासन दिवस याविषयावर माजी मंत्री प्रकाश जावडेकर यांचे व्याख्यान झाले. त्या वेळी ते बोलत होते. श्री. जावडेकर म्हणाले, की वाजपेयींचे नेतृत्व प्रभाव टाकणारे होते. वाजपेयी पंतप्रधान असताना देशातील रस्ते सुधारले. स्वातंत्र्यानंतर ज्यांनी कधी रस्ते पाहिले नाही, अशा गावांत पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून रस्ते पोचले. मोबाईल, विमानसेवेतील क्रांती त्यांच्याच काळात झाली. जगभरात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था भारताची आहे. त्याचे श्रेय सुशासनाला अर्थात, वाजपेयी यांच्या दूरदृष्टीला जाते.

<div class="paragraphs"><p>Centre Minister Prakash Jawadekar.</p></div>
अमरीशभाई आमदार होताच शहादा-शिरपूरच्या रस्त्यांचे भाग्य उजळले!

ते पुढे म्हणाले, सध्या देशात वीस लाख कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. आधार लिंकमुळे रेशनची चोरी थांबली. बॅंकांमध्ये थेट अनुदान जमा होऊ लागल्याने लाभार्थ्यांपर्यंत अनुदानाची संपूर्ण रक्कम पोचली. शिष्यवृत्ती, निवृत्तिवेतनाचा घोळ संपून थेट बॅंकेत पैसे जमा होत आहेत. काँग्रेसने एका योजनेत ७० हजार कोटी रुपये माफ केले होते. परंतु, पंतप्रधान मोदी यांनी सात लाख कोटी रुपयांचे वाटप केले. डिजिटल क्रांतीमुळे सुशासनाला बळ मिळाले. कामात पारदर्शकता आली. गरिबांना घर मिळाले.

श्री. जावडेकर पुढे म्हणाले, कोविडच्या काळात कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन या दोन लशी भारताला मिळाल्या. विरोधकांनी मोदींना त्यावरून लक्ष केले. अपप्रचारानंतर मोदींनी स्वत: लस घेत विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले. कोरोनाकाळात घराबाहेर विरोधी पक्ष पडला नाही. भाजप कार्यकर्ते मात्र रस्त्यावर उतरून रुग्णांना मदत करत होते. असे अद्भुत काम सुशासनामुळेच शक्य होत असल्याचे जावडेकर म्हणाले. भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे, महापौर सतीश कुलकर्णी, आमदार सीमा हिरे, विजय साने, लक्ष्मण सावजी आदी उपस्थित होते.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com