Balasaheb Thorat Politics: थोरात यांचे संजय गायकवाड यांना खडे बोल... "ही तर नथुराम प्रवृत्ति"

Balasaheb Thorat Slams Sanjay Gaikwad in Politics: शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या बेताल वक्तव्याचा काँग्रेस नेत्यांनी घेतला समाचार.
Sanjay Gaikwad & Balasaheb Thorat
Sanjay Gaikwad & Balasaheb ThoratSarkarnama
Published on
Updated on

Balasaheb Thorat vs Sanjay Gaikwad: शिवसेना मुख्यमंत्री शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे आमदार गायकवाड चांगलेच अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर देखील टिका होत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार गायकवाड यांनी काँग्रेसने नेते राहुल गांधी यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान केले. त्यांचे हे विधान म्हणजे राजकीय स्वार्थासाठी समाजामध्ये जाणीवपूर्वक द्वेष पसरवणे आहे. राहुल गांधी जे बोललेच नाही. त्याचा डांगोरा फिटने हा भाजपचा अजेंडा आहे.

भाजपचा अजेंडा शिंदे गट पुढे नेत आहे, असा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. हा अजेंडा आता मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या पक्षाचे आमदार संजय गायकवाड पुढे चालविण्यासाठी आटापिटा करीत आहे. ही भाजप पुढे लाचार झाल्याचे प्रतीक आहे. असा संताप काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

काँग्रेसच्या स्थानिक आणि राज्यातील नेत्यांनीही आमदार गायकवाड यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. या संदर्भात पक्षाचे विधिमंडळ नेते थोरात एका खाजगी कार्यक्रमासाठी नाशिकला आले होते. यावेळी त्यांनी गायकवाड यांचे विधान या देशातील राजकीय, सामाजिक संस्कृतीला शोभणारे नाही, असे म्हटले आहे.

Sanjay Gaikwad & Balasaheb Thorat
Eknath Shinde Politics: शिवसेना शिंदे गटाला दणका, चांदवड मतदार संघात नेत्यांचे सामूहिक राजीनामे!

बाळासाहेब थोरात म्हणाले, अर्थातच संस्कृती आणि गायकवाड यांचा काही संबंध देखील दिसत नाही. आम्हाला आमदार गायकवाड यांच्यात नथुराम गोडसे दिसतात. त्यांच्यात तीच वृत्ती आहे. ते जे बोलले ते अत्यंत आक्षेपार्ह आहे. राज्य सरकारने कसलीही न वाट न पाहता त्यांच्यावर कारवाई करायला हीव होती.

पोलिसांनी देखील कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही, याची खंत वाटते. काँग्रेस नेते गांधी यांनी अमेरिकेत जे भाषण केले. त्यात त्यांनी अतिशय समतोल आणि आरक्षणाच्या समर्थनासाठी विधान केले. मात्र इंग्रजीचे ज्ञान नसलेल्या लोकांकडून त्यावर साप साप म्हणून भुई बडविण्याचा प्रकार केला जात आहे.

राहुल गांधी यांच्याबाबत आमदार गायकवाड यांनी आक्षेपार्ह विधान केले. भारतीय जनता पक्षाने त्यापासून स्वतःला अलिप्त केले आहे. मात्र केवळ अशा आक्षेपार्ह वक्तव्यापासून अलिप्त होऊन चालणार नाही. कारण तसे वातावरण निर्माण करण्यात भाजपचा देखील वाटा आहे, असा आक्षेप काँग्रेसच्या नेत्यांनी घेतला.

Sanjay Gaikwad & Balasaheb Thorat
Goval Padvi Politics: नंदुरबारला 'बदलापूर', आदिवासी अल्पवयीन मुलीच्या हत्येने संताप!

या देशातील आणि राज्यातील जनता सुज्ञ आहे. त्यांना सर्व कळते त्यामुळेच याबाबत राहुल गांधी यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनाला कोणाचाही पाठिंबा मिळाला नाही. यासंदर्भात शहरात देखील तीव्र प्रतिक्रिया उमटले आहेत.

काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदार गायकवाड यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. त्यामुळे आता हे प्रकरण कुठे जाते. त्यावर काय राजकीय प्रतिक्रिया उमटतात याची उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com