Balasaheb Thorat : हर्षवर्धन सपकाळांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर आता बाळासाहेब थोरातांची 'डिनर डिप्लोमसी'

Congress Balasaheb Thorat Sangamner Ahilyanagar special gathering and discussions : ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील काँग्रेसमधील फ्रंटल कार्यकर्त्यांसाठी संगमनेरमध्ये बोलावली महत्त्वाची बैठक.
Balasaheb Thorat
Balasaheb Thorat Sarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News : विधानसभा निवडणुकीत पराभवाचा झटका बसल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात चांगले 'ॲक्टिव्ह मोड'वर आले आहेत. स्वतःच्या संगमनेर मतदारसंघासह जिल्ह्यातील काँग्रेस संघटनेवर पकड मजबूत करण्यावर थोरातांनी लक्ष केंद्रीत केले आहे.

प्रदेश पातळीवर हर्षवर्धन सपकाळ यांनी जबाबदारी सांभाळल्यानंतर काँग्रेसमध्ये संघटनात्मक पातळीवर सकारात्मक बदल होताना दिसत असतानाच, राज्यातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते 'अॅक्शन मोड'वर आले आहेत. यातून बाळासाहेब थोरातांनी 'डिनर डिप्लोमेसी'निमित्त करून आज जिल्ह्यातील काँग्रेसमधील जुने-जाणते, युवक-तरुणांबरोबर संवाद साधणार आहेत.

काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी जिल्ह्यातील काँग्रेस (Congress) पक्षाचे सर्व एकनिष्ठ पदाधिकारी, फ्रंटल अध्यक्ष, तालुकाप्रमुख, निरीक्षक आणि कार्यकर्त्यांना पत्र काढून आज दुपारी दोन वाजता संगमनेर इथं बैठकीला बोलवलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांना स्नेहभोजन होईल आणि त्यानंतर महत्त्वपूर्ण बैठक होईल, असे देखील पत्रात म्हटले आहे.

Balasaheb Thorat
Pune Politics: अजितदादा-एकनाथ शिंदे यांच्यात रस्सीखेच; दोन माजी आमदार कुणाच्या गळाला लागणार?

लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश, त्यानंतर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला (MVA) आणि त्यात काँग्रेसची राज्यात झालेली पिछेहाट, ही संशोधनाचा विषय बनली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात प्रदेश पातळीवर हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे काँग्रेसची सूत्र केली.

हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसला राज्यात बळ देण्यासाठी संघटनात्मक वाढीवर आणि रस्त्यावर उतरून लढाई लढावी लागेल, असे म्हटले. सपकाळ यांचा हा सूचक संदेश राज्यातील काँग्रेसचे सर्वच नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना होता. त्यानुसार संघटनात्मक बांधणीवर थोरातांनी अहिल्यानगर जिल्ह्यात आघाडी उघडल्याचे सांगितले जाते. याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना देखील समोरे जायचे असल्याने ही बैठक महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले जात आहे.

'मविआ'तील तिन्ही पक्षांमध्ये गळती वाढली

राज्यातील महायुती सरकारमधील तीन पक्षांमध्ये इनकमिंग सुरू आहे. महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांमध्ये गळती वाढली आहे. काँग्रेसमधील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पसंती देत आहेत. त्याखालोखाल भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पसंती दिली जात आहे.

ठाकरेंची साथ सोडत, शिंदेसेनेला पसंती

अहिल्यानगर शहरातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पसंती दिली आहे. त्यामुळे अहिल्यानगर शहरात उद्धव ठाकरे शिवसेना चांगली रिकामी झाली आहे.

जिल्ह्यात ठाकरे शिवसेनेची हीच परिस्थिती आहे. काँग्रेसचे पदाधिकारी, नेते स्थिर असले तरी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षात प्रवेश केला आहे. ठाकरे शिवसेनेत काळेंचा पक्षप्रवेश म्हणजे,'मौके पर चौका' असे काँग्रेसमधून म्हटले जात आहे.

Balasaheb Thorat
Bhagwanrao Gore Passes Away: ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या वडिलांचे निधन

भाजप जिल्ह्यात मोठा भाऊ

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्या तरी शहरासह जिल्ह्यात संघटना वाढले नसले, तरी आहे ते अजून तरी स्थिर आहे. सत्तेत असलेला भाजप जिल्ह्यात सध्यातरी मोठा भाऊ म्हणून पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली एकसंघपणे काम करताना दिसतो आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com